विराट भारताचा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू, तर जगात या क्रमांकावर; पाहा टॉप-10 लिस्ट

Virat Kohli : जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीला स्थान मिळाले आहे.
Virat Kohli
Virat Kohliesakal
Updated on

Highest Paid Athletes From 1st sep 2013 to 1st sep 2024: अलीकडच्या काळात खेळाडूंच्या माधनामध्ये उल्लेखनीय वाढ झालेली आहे. स्पर्धेतील बक्षिसे, सामन्याचे मानधन, जाहिरातींमधून मिळणारे पैसे अश्या अनेक मार्गांनी खेळाडूंची कमाई होत असते.

नुकतीच Statista ने १ सप्टेंबर २०२३ ते १ सप्टेंबर २०२४ दरम्यान सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. यामध्ये पहिल्या १० जणांमध्ये भारताचा एकमेव खेळाडू आहे. तो खेळाडू म्हणजे विराट कोहली.

दरम्यान, जगातील सर्वात जास्त कमाई करणाऱ्या १० खेळाडूंबद्दल आज आपण जाणून घेऊयात.

Virat Kohli
Paralympic 2024: पॅरिसमध्ये इतिहास घडवणाऱ्या भारतीय खेळाडूंचे जोरदार स्वागत; जल्लोष पाहून पदकविजेते भारावले

१. पोर्तुगल फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू म्हणून अव्वल स्थानावर आहे. गेल्या वर्षभरात या दिग्गज खेळाडूने तब्बल २०८१ कोटींची कमाई केली आहे.

२. जॉन रहम या प्रतिष्ठित स्पॅनिश गोल्फरने यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. मागील वर्षभरामध्ये त्याने १७२२ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

३. लिओनेल मेस्सी हा आज जगातील सर्वात प्रतिष्ठित फुटबॉलपटूंपैकी एक आहे. २०२२ च्या फुटबॉल विश्वचषकात विजेतेपद जिंकणाऱ्या मेस्सीने तब्बल १०७४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ronaldo-messi
ronaldo-messiesakal

४. लेब्रॉन जेम्स, एक प्रख्यात बास्केटबॉल खेळाडू अलीकडेच या खेळात सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत सामील झाला आहे. त्याने गेल्या वर्षभरात तब्बल ९९० कोटी रुपयांची कमाई केली आहे.

५. मागील एक वर्षाच्या कालावधीत ८८१ कोटी रुपयांची कमाई करून युवा फुटबॉलपटू किलियन एम्बाप्पे याने यादीत पाचवे स्थान मिळवले आहे.

Virat Kohli
जिममध्ये हिटमॅनचा 'बाहुबली' अवतार दिसला, टायर लिफ्टिंग अन्..., बांगलादेश कसोटीआधी कसरतीचा व्हिडिओ व्हायरल

६. बास्केटबॉल खेळाडू गियानिस अँटेटोकोंम्पो, जो सध्या एनबीएमध्ये मिलवॉकी बक्स संघाकडून खेळतो. सर्वाधिक कमाई करणाऱ्यांच्या यादीत सहाव्या स्थानावर आहे. त्याने तब्बल ८७३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

७. ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारने १ सप्टेंबर २०२३ ते १ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ८६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

८. प्रसिद्ध फ्रेंच फुटबॉलपटू करीम बेंझेमा याने तब्बल ८६४ कोटी रुपयांची कमाई केली आहे आणि यादीमध्ये आठवे स्थान मिळवले आहे.

Virat Kohli | Neymar
Virat Kohli | NeymarSakal

९. भारतीय स्टार क्रिकेटपटू विराट कोहली हा भारतातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू असून जगात नवव्या स्थानावर आहे. विराटने तब्बल ८४७ कोटी रुपयांची कमाई केली.

१०. स्टिफन करी हा अमेरिकन बास्केटबॉलपटू गोल्डन स्टेट वॉरियर्स संघाचा एक प्रमुख खेळाडू आहे. तो ८३१ कोटी रुपयांच्या कमाईसह यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.