WPL 2023 RCB vs GUJ : 'करो या मरो' अशा वाटेवर उभ्या असलेल्या बंगळूर संघाने गुजरातवर ८ विकेटने दणदणीत विजय मिळवून महिला प्रीमियर लीगमधील आव्हान कायम ठेवले. झंझावाती खेळी करणाऱ्या सोफी डेव्हिनचे शतक एका धावेने हुकले.
स्पर्धेतले आव्हान कायम ठेवायचे, तर केवळ विजय नव्हे, तर सरासरीही उंचावण्याची गरज असलेल्या बंगळूर संघाने १८९ हे मोठे आव्हान १५.२ षटकातच पार केले. सोफी डेव्हिनने ३६ चेंडूत तब्बल २७५ च्या स्ट्राईक रेटने ९९ धावा टोलावल्या. यात तिने ९ चौकार आणि ८ षटकार मारले. फॉर्म सापडलेल्या स्मृती मानधनाने ३१ चेंडूत ३७ धावा केल्या. या दोघांनी ९.२ पटकांत १२५ धावांची सलामी दिली.
तत्पूर्वी लौरा व्हॉलवर्ट (६८) आणि अँशले गार्डनर (४१) यांच्या फटकेबाजीमुळे गुजरात संघाने २० षटकांत ४ बाद १८८ धावा केल्या; परंतु विजयासाठी त्या पुरेशा ठरल्या नाहीत.
संक्षिप्त धावफलक : गुजरात जायंटस २० षटकांत ४ बाद १८८
(लौरा व्हॉल्वर्ट ६८ - ४२ चेंडू, ९ चौकार, २ षटकार, एस. मेघना ३१ - ३२ चेंडू, ४ चौकार, अॅशले गार्डनर ४१ - २६ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, दयालन हेमलता नाबाद १६ -६ चेंडू, २ चौकार, १ षटकार, हर्लिन देओल नाबाद १२-५ चेंडू, १ चौकार, १ षटकार, सोफी डेव्हिन ३-०-२३-१, श्रेयांका पाटील २-०-१७- २)
पराभूत वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळूर : १५.३ षटकांत २ बाद १८९
(स्मृती मानधना ३७ - ३१ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, सोफी डेव्हिन ९९ - ३६ चेंडू, ९ चौकार, ८ पटकार, एलिस पेरी नाबाद १९, हेथर नाईट नाबाद २२. किम प्रेथ ४-०-३२-१)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.