Womens Premier League : आयपीएलच्या धर्तीवर बीसीसीआयने यावर्षीपासून महिला प्रीमियर लीग सुरू करण्याचा निर्णय घेतला. या लीगसाठी टाटा ग्रुप प्रायोजक टायटल स्पॉन्सरही जाहीर करण्यात आले आहेत. टाटा समूह आधीच आयपीएलचा टायटल स्पॉन्सर आहे. आता अशा परिस्थितीत बीसीसीआयने महिला क्रिकेटला चालना देण्याची जबाबदारीही टाटा यांच्यावर सोपवली आहे. डब्ल्यूपीएलचा उद्घाटन हंगाम 4 मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
BCCI सचिव जय शाह यांनी एका ट्विटद्वारे जाहीर केले की, मला पहिल्या महिला प्रीमियर लीग हंगामाचा टाटा समूहाचे शीर्षक प्रायोजक म्हणून घोषित करताना खूप आनंद होत आहे. मला त्यांचा पाठिंबा मिळाला आहे आणि मला विश्वास आहे की आम्ही महिला क्रिकेटला पुढील स्तरावर नेऊ. टाटा समूहासोबत बीसीसीआयच्या या कराराचा खुलासा सध्या करण्यात आलेला नाही, परंतु बीसीसीआयच्या सूत्राने पीटीआयशी बोलताना सांगितले की टाटाने पाच वर्षांसाठी हक्क विकत घेतले आहेत.
बीसीसीआयने महिला आयपीएलच्या पहिल्या सत्राचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. पहिल्या सत्रात एकूण 5 संघ 22 सामने खेळल्या जातील. सर्व सामने मुंबईतील डीवाय पाटील आणि ब्रेबॉर्न या दोन स्टेडियममध्ये होणार आहे. मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स, यूपी वॉरियर्स, रॉय चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स असे एकूण पाच संघ या स्पर्धेत उतरतील, ज्यांच्यामध्ये सामना पाहायला मिळणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.