WPL 2023: जेमिमाहची भारीच फिल्डींग! सूर मारत घेतलेला कॅच पाहून तुम्हीही व्हाल थक्क; पाहा व्हिडिओ

wpl 2023 watch-video-jemimah-rodrigues-takes-amazing-catch
wpl 2023 watch-video-jemimah-rodrigues-takes-amazing-catch
Updated on

WPL 2023 Jemimah Rodrigues : महिला प्रीमियर लीगमध्ये सोमवारी रात्री झालेल्या एकतर्फी सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून पराभव केला. मात्र दिल्लीच्या विजयापेक्षा स्टार अष्टपैलू जेमिमाह रॉड्रिग्जच्या झेलचीच जास्त चर्चा होत आहे. जेमिमाहने धावताना सूर मारत घेतलेला झेल पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

wpl 2023 watch-video-jemimah-rodrigues-takes-amazing-catch
IND vs AUS 3rd ODI: चेन्नईत हरलो तर… केवळ मालिकाच नाही तर सत्ताही धोक्यात!

डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स प्रथम फलंदाजीसाठी उतरली. तिसऱ्या षटकातच संघाने अवघ्या 6 धावांत 2 विकेट गमावल्या. डावातील चौथे षटक टाकण्यासाठी शिखा पांडे आली. त्याच्यासमोर हेली मॅथ्यूज होती. शिखाच्या फुल लेन्थ बॉलवर मॅथ्यूजने चौकार मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू काही काळ हवेतच राहिला.

दरम्यान, मिडऑनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या जेमिमाह रॉड्रिग्जने उजवीकडे जोरदार डाईव्ह टाकली. जेमिमाने उत्तम पद्धतीने झेल घेतला. उत्कृष्ट क्षेत्ररक्षणानंतर जेमिमाने अशी प्रतिक्रिया दिली की जणू तिला स्वतःच्याच झेलवर विश्वास बसत नाही. विकेटचा आनंद साजरा करताना तिने बॉलचे चुंबनही घेतले.

wpl 2023 watch-video-jemimah-rodrigues-takes-amazing-catch
WPL 2023चा आज मिळणार पहिला फायनलिस्ट! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

जेमिमाह रॉड्रिग्जच्या झेलचा व्हिडिओ डब्ल्यूपीएलच्या ट्विटर हँडलवरही शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जेमिमाहने टूर्नामेंटच्या एका सामन्यात अ‍ॅलिसा मॅथ्यूजलाही असाच स्लाइडिंग झेल देऊन बाद केले होते.

मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या धक्क्यातून सावरता आले नाही. हरमनप्रीत कौरचा संघ 20 षटकात 8 विकेट गमावून 109 धावाच करू शकला. प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सने 9 षटकांत एक गडी गमावून लक्ष्य गाठले. शेफाली वर्माने 15 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार मारत 32 धावा केल्या. एलिस कॅप्सी 38 धावांवर नाबाद परतली आणि कर्णधार मेग लॅनिंगने 32 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.