निरगुडसर : जिद्द,चिकाटी आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर काहीच अशक्य नाही याचेच एक उदाहरण म्हणजे आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील श्रद्धा भाऊसाहेब पोखरकर हिने मागील काही महिन्यात झालेल्या वन डे आणि टी-ट्वेंटी महिला क्रिकेट स्पर्धेत केलेल्या अप्रतिम कामगिरीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुर या संघाने आजपासून होणार्या महिला प्रिमीअर लीगसाठी श्रद्धाला आपल्या ताफ्यात घेतले आहे.
Shraddha Pokharkar Royal Challengers Bangalore WPL 2024
भारतातील महिला प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेच्या यंदाच्या मोसमाला आजपासून बंगळुर येथे सुरुवात होत आहे,ही स्पर्धा बंगळूर आणि दिल्ली या दोन ठिकाणी खेळवल्या जाणार आहेत,या स्पर्धेत मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स,गुजरात जायंट्स,रॉयल चॅलेंजर्स बंगळूर व युपी वॉरियर्स हे पाच संघ सहभागी होणार आहेत,यामधील रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघामध्ये आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील शेतकरी कुटुंबातील श्रद्धा पोखरकर हिची निवड झाली आहे.
(Who is Shraddha Pokharkar Ambegaon)
श्रद्धाला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती,शालेय शिक्षण थोरांदळे व रांजणी याठिकाणी पूर्ण केल्यानंतर अकरावी व बारावीचे शिक्षण मंचर याठिकाणी पूर्ण करून कॉम्पुटर इंजिनियरच्या डीग्रीचे शिक्षण पुण्यात घेता घेता क्रिकेटचे धडेही गिरवले आणि शेतकऱ्याची कन्या आज मोठ्या दिमाखाने क्रिकेटचे मैदान गाजवत आहे, अशा प्रकारे शेतकरी कुटुंबातील श्रद्धा पोखरकर हीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघामध्ये समावेश झाल्याने परिसरातून तिचे कौतुक केले जात आहे.
मागील काही महिन्यात तिने महाराष्ट्र महिला संघाकडून खेळताना कटक येथे झालेल्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती तसेच डिसेंबर व जानेवारी महिन्यात देखील झालेल्या वनडे क्रिकेट स्पर्धेमध्ये ही श्रद्धाने चमकदार कामगिरी केली होती,या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुर संघाने आपल्या ताफ्यात सहभागी करून घेतले आहे.
श्रद्धा पोखरकर म्हणाली की, मागील काही महिन्यात टी ट्वेंटी स्पर्धेत आणि वनडे स्पर्धेत केलेल्या कामगिरीमुळे माझी निवड रॉयल चॅलेंजर्स बंगळुर संघात झाली आहे,पण मला इथपर्यंत थांबायचे नाही मला देशासाठी खेळायचे असून भारतीय महिला संघात खेळण्याचे माझे स्वप्न आहे,यासाठी मी दिवस रात्र सराव करेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.