WPL Auction 2023 RCB : वुमन्स प्रीमियर लीग 2023 च्या ऐतिहासिक लिलावात भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिचे नाव समोर आले. स्मृतीसाठी मुंबई इंडिन्सच्या नीता अंबानी आग्रही दिसल्या. मात्र आरसीबीने स्मृतीसाठी आक्रमकपणे बोली लावत तिला 3.40 कोटी रूपयाला खरेदी केले.
यानंतर आरसीबी इथंच थांबली नाही. आरसीबीने ऑस्ट्रेलियाची अनुभवी अष्टपैलू खेळाडू एलिस पेरीला 1.7 कोटी रूपये खर्च करून खरेदी केले. ही त्यांची दुसरी करोडपती खेळाडू ठरली. पाठोपाठ आरसीबीने न्यूझीलंडच्या सोफी डिवाईनला 50 लाख बेस प्राईसला खरेदी करत अजून एक अष्टपैलू खेळाडू गळाला लावला. आरसीबीने पहिल्याच दणक्यात तीन खेळाडू घेतले. यासाठी संघाने जवळपास 5 कोटी 60 लाख रूपये खर्च केले. आता त्यांच्या पर्समध्ये फक्त 6 कोटी 40 लाख रूपये राहिले आहे.
दुसरीकडे पहिल्या फेरीत मुंबई इंडियन्स, गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांनी प्रत्येकी 1 खेळाडू खरेदी केला. तर दिल्लीने खातेही उघडलेले नाही.
मुंबई इंडियन्सने स्मृती मानधनासाठी चांगले प्रयत्न केले. मात्र आरसीबीने बाजी मारली होती. अखेर मुंबईला स्मृती नाही तर हरमनप्रीत कौर मात्र मिळाली. त्यांनी हरमनप्रीतवर 1.8 कोटी रूपयांची बोली लावली. अश्लेघ गार्डनरसाठी गुजरात जायंट्सने 3.2 कोटीला खरेदी केले. सोफी एक्कलस्टोनसाठी दिल्ली आणि यूपी वॉरियर्स यांच्यात स्पर्धा होती. यूपी वॉरियर्सने 1.8 कोटी ला खरेदी केले.
हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.