WPL Auction : मुंबई, गुजरातने जाता जाता इतिहास रचला! लिलाव गुंडाळलाच होता मात्र...

WPL Auction 2023 Youngest Cricketer
WPL Auction 2023 Youngest Cricketeresakal
Updated on

WPL Auction 2023 Youngest Cricketer : वुमन्स प्रीमियर लीग 2023 चा ऐतिहासिक लिलाव 13 फेब्रुवारीला पार पडला. या लिलावात अनेक भारतीय महिला क्रिकेटपटूंनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. लिलावात आरसीबी सुरूवातीला आक्रमक होती. तर दिल्लीने संथ सुरूवात केली होती. मात्र मुंबई इंडियन्सचा लिलाव संपला तरी संघाचा कोटा पूर्ण झाला नव्हता.

WPL Auction 2023 Youngest Cricketer
WPL Auction Harmanpreet Kaur : एकेकाळची षटकार क्वीन हरमनप्रीत संपल्यात जमा? ज्यूनियर खेळाडूंनीही...

अखेर मुंबई इंडियन्सला संघ पूर्ण करता यावा यासाठी लिलावाची अजून एक फेरी घेण्यात आली अन् त्याच फेरीत मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्सने इतिहास घडवला! गुजरात जायंट्सने आंध्र प्रदेशच्या 15 वर्षाच्या शबमन शकीलला 10 लाख बोली लावत आपल्या संघात घेतले. तर मुंबई इंडियन्सने उत्तर प्रदेशच्या 15 वर्षांच्याच सोनम यादवला 10 लाख बोली लावत मुंबईकर केले.

विशेष म्हणजे या दोघी युवा खेळाडू या 19 वर्षाखालील वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाच्या सदस्य होत्या. शबनम शकील ही वेगवान गोलंदाज आहे तर सोनम यादव ही डावखुरी फिरकीपटू आहे. दोघींनीही आपल्या विकेट घेण्याच्या क्षमतेने सर्वांना प्रभावित केले होते. या दोघींनी WPL मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

WPL Auction 2023 Youngest Cricketer
WPL 2023 : स्मृती मानधना RCB आणि हरमनप्रीत मुंबईकडून खेळणार, 87 खेळाडूंना मिळाले स्थान, पहा संपूर्ण यादी

यामुळे भारतात महिला क्रिकेट वाढण्यासाठी आणि प्रसिद्ध होण्यासाठी चांगली मदतच होईल. या दोन युवा खेळाडू देशातील इतर मुलींसाठी एक प्रेरणा बनतील, यामुळे जास्तीजास्त मुली क्रिकेटकडे एक करिअर ऑप्शन म्हणून पाहू लागतील. सोनम आणि शबनम यांना क्रिकेट जगतासमोर आपले गुणवत्ता सिद्ध करण्याची एक नामी संधी मिळाली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.