Wrestler Protest Anurag Thakur : दिल्ली पोलिसांचा अहवाल येईपर्यंत थांबा... अखेर क्रीडा मंत्री बोलले

Wrestler Protest Anurag Thakur
Wrestler Protest Anurag Thakur esakal
Updated on

Wrestler Protest Anurag Thakur : महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्धचे आंदोलन तीव्र केले आहे. महिला कुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांना अटक करावी अशी मागणी करत गेल्या दोन महिन्यापासून आंदोलनाला बसल्या आहेत. यावरून आता देशातले राजकारण तापू लागले आहे. दरम्यान, याबाबत आता केंद्रीय क्रीडा मंत्र अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विरोधकांना दिल्ली पोलीस आणि सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवण्यास सांगितले आहे.

Wrestler Protest Anurag Thakur
Wrestler Protest Sachin Tendulkar : कुस्तीपटूंच्या आंदोलनावर कधी बोलणार... सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी

माध्यमांशी बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, 'आमच्या सरकारच्या काळत खेळासाठीचे बजेट वाढवले. खेलो इंडिया, टॉप्स स्कीम या सुरू करण्यात आल्या. खेळाडूंच्या सरावावर भरपूर निधी खर्च करण्यात येत आहे. खेळासाठीच्या पायाभूत सुविधा देखील निर्माण करण्यात येत आहेत. आम्ही खेळासाठी अजून काही तरी करू इच्छितो.'

अनुराग ठाकूर पुढे म्हणाले की, 'आम्ही या प्रकरणी खेळाडूंशी चर्चा करून एक समिती स्थापन केली होती. त्यांनी निष्पक्षपणे चौकशी केली. त्यांनी क्रीडा मंत्रालयाला त्यांचा अहवाल सादर केला. दिल्ली पोलिसांनी एफआयआर देखील दाखल केली. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात देखील पोहचले. त्यांनी जिल्हा सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले. कुस्तीपटूंच्या अडचणी खुल्यापणाने ऐकून घेण्यात आल्या. आम्ही कोणताही हलगर्जीपणा केला नव्हता.'

Wrestler Protest Anurag Thakur
Yashasvi Jaiswal WTC Final 2023 : पहिल्याच नेट सेशनमध्ये यशस्वीनं मैदान मारलं; Video होतोय व्हायरल

क्रीडा मंत्री चौकशीबाबत म्हणाले की, 'कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांच्या चौकशीचा अहवाल येण्याची वाट पाहिली पाहिजे. खेळाचे किंवा युवा कुस्तीपटूंचे कोणतेही नुकसान होईल असे पाऊल उचलू नये. त्यांनी चौकशी सुरू असताना पोलीस, सर्वोच्च न्यायालय आणि मंत्रालयावर विश्वास ठेवला पाहिजे. आम्ही सर्व खेळ आणि खेळाडूंच्या बाजूनेच आहोत. आम्हाला देखील निष्पक्ष चौकशी व्हावी आणि जर कोणी दोषी आढळले तर त्यावर कारवाई करण्यात यावी असे वाटते.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()