Wrestler Protest Sachin Tendulkar : कुस्तीपटूंच्या आंदोलनावर कधी बोलणार... सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर पोस्टरबाजी

Wrestler Protest Sachin Tendulkar
Wrestler Protest Sachin Tendulkaresakal
Updated on

Wrestler Protest Sachin Tendulkar : दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाचे पडसाद आता महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. नव्या संसद भवनाच्या उद्घटान सोहळ्यावेळीच जंतर मंतरवर भाजप खासदार बृजभूषण यांच्याविरूद्ध आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंना दिल्ली पोलिसांनी अत्यंत क्रूरपद्धतीने ताब्यात घेतले. यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली.

आता महाराष्ट्रात देखील याचे पडसाद उमटू लागले आहेत. भारतरत्न सचिन तेंडुलकर याच्या घरासमोर कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत कधी बोलणार असा फलक झळकला आहे.

Wrestler Protest Sachin Tendulkar
Yashasvi Jaiswal WTC Final 2023 : पहिल्याच नेट सेशनमध्ये यशस्वीनं मैदान मारलं; Video होतोय व्हायरल

सचिन तेंडुलकरने बृजभूषण यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूबाबत आपली भुमिका अजून स्पष्ट केलेली नाही. जवळपास गेल्या 2 महिन्यापासून ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटू दिल्लीत आंदोलन करत आहेत. हाच मुद्दा पकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्विट करत सचिन तेंडुलकरला काही प्रश्न विचारले होते.

Wrestler Protest Sachin Tendulkar
Wrestler Protest : परमेश्वर माझ्याकडून मोठं काम करवून घेणार... लैंगिक शोषणाचा आरोपांवर बृजभूषण हे काय म्हणाले?

त्यांनी ट्विट केले होते की, 'प्रीय सचिन भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारच्या स्वच्छ मुख अभियानासाठी स्माईल अम्बेसिडर म्हणून नियुक्ती केल्याचे ऐकून चांगले वाटले. मात्र तुला माहिती आहे का भाजप आणि त्यांचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आपल्या कुस्तीपटूंचे हास्य हिरावून घेतले आहे. कुस्तीपटू न्यायासाठी लढत आहेत. मात्र खासदाराला वाचवण्यासाठी भाजपने डोळे मिटून घेतले आहेत.'

क्रास्टो पुढे म्हणतात, 'तुझ्यासारखेच भारतीय महिला कुस्तीपटू देखील आपल्या देशाच्या गौरव आहेत. एक खेळाडू म्हणून तू त्यांना समर्थन देणे हे तुझे कर्तव्य आहे. आशा आहे की तू बोलशील आणि त्यांचाही स्माईल अम्बेसिडर बनशील.'

Wrestler Protest Sachin Tendulkar
Wrestlers Protest: पॉक्सो अंतर्गत FIR नंतरही बृजभूषणला अटक का नाही? कपिल सिब्बल भडकले "काय हाच आहे नवा इंडिया?"

दरम्यान, भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा म्हणून राज ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या प्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. तर भाजपच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. प्रीतम मुंडे यांनी बृजभूषण यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()