Wrestler Protest Bajrang Punia : केजरीवाल सरकार बजरंगला करणार प्रमुख क्रीडा सल्लागार

Wrestler Protest Bajrang Punia
Wrestler Protest Bajrang PuniaESAKAL
Updated on

Wrestler Protest Bajrang Punia : आलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंसोबत जंतर मंतरवर आंदोलनासाठी बसलेल्या बजरंग पुनिया दिल्ली सरकार सोबत काम करणार आहे. भारताचे नावाजलेले कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत आंदोलन करत आहेत. सात महिला कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. या आंदोलनात बजरंग पुनिया, विनेश फोगाट आणि साक्षी मलिक या स्टार कुस्तीपटूंचा देखील समावेश आहे.

Wrestler Protest Bajrang Punia
PBKS vs MI : आर्चरची 4 षटकात हाफ सेंचुरी; लिव्हिंगस्टोनने जवळपास 200 च्या स्ट्राईक रेटने केली धुलाई

दरम्यान, दिल्ली सरकारने ऑलिम्पिक पदक विजेत्या बजरंग पुनियाला प्रमुख क्रीडा सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या बजरंग पुनिया हा भारतीय रेल्वेमध्ये राजपत्रित अधिकारी आहे. मात्र आंदोलनाला बसलेल्या बजरंग पुनियाला सतत ड्युटीवर हजर राहण्यास सांगण्यात येत आहे. यामुळे त्याने नॉर्दन रेल्वेकडे त्याने डेप्युटेशनची मागणी केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्याची ही मागणी मान्य करण्यात आली आहे. तो आता एक दोन दिवसात नॉर्दन रेल्वेमधून दिल्ली सरकारकडे डेप्युटेशनवर जोडला जाईल.

बृजभूषण यांच्याविरूद्ध कुस्तीपटूंनी जानेवारीमध्ये आंदोलनला सुरूवात केली होती. विनेशने या आंदोलनादरम्यान भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. ज्यावेळी क्रीडा मंत्रालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली त्यानंतर कुस्तीपटूंनी आपले आंदोलन मागे घेतले होते.

Wrestler Protest Bajrang Punia
LSG vs CSK : चेन्नई - लखनौ सामन्यात पावसाने केला मोठा खेळ; धोनीचे चाहते नाराज तर पांड्याची गुजरात झाली खूष

मेरी कोमच्या नेतृत्वाखाली या चौकशी समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीचा अहवाल अजून सार्वजनिक झालेला नाही. यानंतर कुस्तीपटूंना 23 एप्रिलपासून पुन्हा जंतर मंतरवर आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी या प्रकरणी पोलीस एफआयआर दाखल करत नसल्याचा आरोप केला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यावर पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केली आहे. दिल्ली पोलिसांनी बृजभूषण यांच्याविरूद्ध कनॉट प्लेस पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.