Wrestler Protest Supreme Court Retired judge Madan B Lokur : सर्वोच्च न्यायालयाचे सेवनिवृत्त न्यायाधीश मदन बी लोकुर यांनी मंगळवारी महिला कुस्तीपटूंनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर टीका केली. भारताच्या ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.
या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली होती. सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल करून घेतली. तसेच कुस्तीपटूंना मागणीनुसार सुरक्षा देखील पुरवली. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने या बाबतची महिला कुस्तीपटूंची याचिका बंद केली.
कुस्तीपटूंच्या वतीने वरिष्ठ वकील नरेंद्र हुड्डा यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली या प्रकारणाचा तपास व्हावा अशी विनंती केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वातील पीठाने ही विनंती मान्य केली नाही.
यावरूनच निवृत्त न्यायाधीश लोकुर यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने एफआयआर दाखल करण्यात टाळाटाळ करणाऱ्या दिल्ली पोलिसांना सुटकेची संधी द्यायला नको होती.
लोकुर म्हणाले, 'सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलिसांना आधी विचारायला हवे होते की या प्रकरणी तुम्ही आधीच एफआयआर का दाखल केली नाही. प्रकरण आमच्या समोर आल्यावर मग हे सांगण्याचा काय अर्थ आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने असं केलं नाही.'
'सर्वोच्च न्यायालयाने कुस्तीपटूंच्या जिवाताला धोका आहे हे मान्य केलं. तुम्ही असं म्हणू शकत नाही की जर पुढे काही झालं तर तुम्ही खालच्या कोर्टात जायला हवं. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात सांगायला हवं होतं की कोणतीही चुकीची गोष्ट घडू नये म्हणून आम्ही तपासावर लक्ष ठेवणार आहोत.'
लोकुर म्हणाले की सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीही तपासावर लक्ष ठेवले आहे. असं केल्यानं ज्या व्यक्तीविरूद्ध आरोप झालेत तो दोषी आहे हे अधोरेखित होत नाही. यामुळे तपास व्यवस्थित व्हावा हे अधोरेखित होते. लोकुर म्हणाले, 'मला असे वाटते की स्थितीची पूर्णपणे खातरजमा करून न घेता चौकशीवर लक्ष न ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.