Sagar Dhankar Murder Case : नवी दिल्ली : पैलवान सागर राणा हत्येप्रकरणात दिल्ली पोलिसांनी दोनवेळचा ऑलिम्पिकवीर सुशील कुमारला अटक केली आहे. स्पेशल सीपी-स्पेशल सेल नीरज ठाकुर यांनी याबाबतची माहिती दिली आहे. सुशील कुमार याच्यासोबत त्याचा साथीदार अजय सहावरत यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाच्या 15 तुकड्या दिल्ली, पंजाबसह उत्तर प्रदेश, हरियाणा आणि उत्तराखंडमध्ये वेगवेगळ्या भागात सुशील कुमारचा शोध घेत होत्या. शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानं आज, सुशील कुमार आणि त्याच्या साथीदाराला दिल्लीतील Mundka परिसरातून अटक केली आहे.
सागर धनखडच्या हत्यप्रकरणात 15 मे रोजी त्याच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होतं. दिल्लीतील कोर्टाने छत्रसाल स्टेडियमवर झालेल्या वादाच्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार (Sushil Kumar) आणि अन्य सहा जणांवर दोन अजामीनपात्र वारंट (Non-bailable warrant) जारी केले होते. सुशील कुमारती माहिती देणाऱ्याला दिल्ली पोलिसांनी 1 लाख रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली असून त्याचा साथीदार अजय याच्यावर 50 हजारचे बक्षीसाची घोषणा करण्यात आली होती.
काय आहे प्रकरण?
दिल्लीतील छत्रसाल स्टेडियमवर 4 मे रोजी पैलवानांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यातच सागर राणाचा मृत्यू झाला. याप्रकरणात सुशीलकुमारसह सहा जणांवर प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला होता. तेव्हापासून सुशील कुमार फरार होता. दिल्ली मॉडल टाउन परिसरातील एका फ्लॅटवरुन दोन्ही गटात भांडणं झाले होते. सुशील कुमारने याप्रकरणानंतर कोणत्याही पैलवानाचा हात नसल्याचे म्हटले होते. मात्र प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सुशील कुमार मृत सागरला मारहाण करताना दिसून आले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.