रेफ्रीला ठोसा लगावणारा कुस्टीपटू सतेंद्र मलिकवर कायमची बंदी

रेफ्रीला ठोसा लगावणारा कुस्टीपटू सतेंद्र मलिकवर कायमची बंदी
Updated on

नवी दिल्ली : भारताचा कुस्तीपटू (Wrestler) सतेंद्र मलिकवर (Satender Malik) कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाने (Wrestling Federation of India)आयुष्यभरासाठी बंदी (Life Ban) घातली आहे. त्याच्यावर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावरील खाशाबा जाधव हॉलमध्ये रेफ्री जगबीर सिंह यांना ठोसा मारल्याप्रकरणी ही बंदी घालण्यात आली आहे.

2022 च्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या निवड चाचणी सामन्यांवेळी मलिकने 125 गटातील फायनल हरली होती. त्यानंतर त्याने रेफ्रीला मारहाण केली होती. यामुळे त्याच्यावर बंदीची कारवाई करण्यात आली.

रेफ्रीला ठोसा लगावणारा कुस्टीपटू सतेंद्र मलिकवर कायमची बंदी
VIDEO : रोहितने आपली 'खुर्ची' ब्रेविसला देत जिंकले चाहत्यांचे मन

कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांनी एनएआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, 'ज्यावेळी त्याने मैदानावर रेफ्रींना ठोसा मारला त्याचवेळी सतेंद्रवर आयुष्यभरासाठी बंदी घालण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. आता त्याला इथून पुढे कोणत्याही कुस्ती स्पर्धेत भाग घेता येणार नाहीये.'

रेफ्रीला ठोसा लगावणारा कुस्टीपटू सतेंद्र मलिकवर कायमची बंदी
कोरोनाची भीती कायम! चीनमधील आशियाई पॅरा गेम्स स्थगित

सतेंद्र मलिकने पहिल्यांदा रेफ्रीला शिवीगाळ केली आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली. त्यामुळे जगबीर यांचा तोल गेले आणि ते खाली पडले. दरम्यान, राष्ट्रकुल स्पर्धेच्या निवड चाचणीबाबत बोलायचे झाले तर रवी दहिया (57 किलो), बजरंग पुनिया (65 किलो), नवीन (74 किलो) दीपक पुनिया (86 किलो), दीपक (97 किलो) आणि मोहित दहिया (125 किलो) यांची निवड झाली आहे. ते आता बर्मिंगहॅमच्या 2022 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. ही स्पर्धा 28 जुलै ते 8 ऑगस्ट रोजी युकेमध्ये होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.