Asian Games 2023 : बजरंग पुनिया, विनेश फोगाटला मिळणार विशेष सूट; आता होणार डायरेक्ट एन्ट्री

Asian Games 2023 Bjrang Punia Vinesh Phogat
Asian Games 2023 Bjrang Punia Vinesh Phogatesakal
Updated on

Asian Games 2023 : गेल्या काही महिन्यांपासून भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलन केल्याने बजरंग पुनिया (Bjrang Punia) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) हे चर्चेत आले होते. मात्र गृहमंत्र्यांनी लैंगिक शोषणाच्या आरोप झालेल्या बृजभूषण यांच्याविरूद्ध आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर या कुस्तीपटूंनी आपले आंदोलन स्थगित केले होते.

सप्टेंबर महिन्यात चीनमध्ये होणाऱ्या एशियन गेम्ससाठी बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांच्या समावेशाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता या दोघांनाही एशियन गेम्ससाठी थेट प्रवेश दिला जाईल. त्यांना ट्रायल्सला सामोरे जाण्याची गरज नाही. संबंधित समितीने त्यांना याबाबत सूट दिल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.(Wrestling News)

Asian Games 2023 Bjrang Punia Vinesh Phogat
ICC Ranking Smriti Mandhana : मोठी खेळी नाही तरी स्मृती फायद्यात; कर्णधार हरमनची मात्र मोठी घसरण

भारतीय पदकविजेत्या कुस्तीपटूंनी बृजभूषण यांच्याविरूद्ध दोनवेळा जंतर मंतरवर आंदोलन केले. या आंदोलनाचे विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी केलं होतं. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केली असून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे.

दरम्यान, या प्रकरणी आज भाजप खासदार असलेल्या बृजभषूण शरण सिंह आणि विनोद तोमर यांना अंतरिम जामीन मंजूर झाला. त्यांच्या नियमित जामिनावर येत्या 20 जुलैला सुनावणी होणार आहे.

न्यायालयात बृजभूषण शरण सिंह यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी, आरोपपत्र दाखल होईपर्यंत बृजभूषण यांना अटक झाली नाही. याचाच अर्थ त्यांच्याविरूद्ध करण्यात आलेल्या आरोपांना पुष्टी देणारे पुरावे नाहीयेत असा युक्तीवाद केला.

Asian Games 2023 Bjrang Punia Vinesh Phogat
ODI WC 2023: आगरकर निघाला विंडीजला! वर्ल्ड कपसोबतच रोहित-विराटच्या भविष्यावर होणार मोठा निर्णय

बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जाची सुनावणी सुरू असून आज त्यांना न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला. यावेळी बृजभूषण शरण सिंह हे स्वतः न्यायालयात हजर होते. त्यांच्या नियमित जामीन अर्जावर आता 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.