WFI Elections : ब्रिजभूषण यांचे १८ प्रतिनिधी रिंगणात; कुस्ती संघटनेवर बाहेरून वर्चस्व राखण्यासाठी डावपेच

ब्रिजभूषण यांचे प्रतिनिधी निवडणुकीत महत्त्वाच्या पदांसाठी लढणार
wrestlers protest 18 bjp mp sexual harassment accused brij bhushan supporters file nominations for wfi elections
wrestlers protest 18 bjp mp sexual harassment accused brij bhushan supporters file nominations for wfi electionsSakal
Updated on

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेच्या कार्यकारिणीत स्वत:सह कुटुंबातील व्यक्तींना स्थान न मिळाल्यामुळे आता ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपले प्रतिनिधी निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत.

ब्रिजभूषण यांनी आपल्या नजीकच्या व्यक्तींना भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत १८ विविध पदांसाठी तयार केल्याची बातमी प्रसार माध्यमांमधून समोर आली आहे. काही कुस्तीपटूंकडून त्यांच्यावर आरोपही करण्यात आले आहेत.

ब्रिजभूषण यांचे प्रतिनिधी निवडणुकीत महत्त्वाच्या पदांसाठी लढणार आहेत. अध्यक्षपदासाठी त्यांचा एक उमेदवार उभा राहिला आहे. उपाध्यक्षपदासाठी सहा, कार्यकारी सदस्यपदासाठी सात, सहसचिव पदासाठी दोन, जनरल सेक्रेटरी पदासाठी एक आणि खजिनदार पदासाठी एक असे उमेदवार निवडणुकीसाठी तयार करण्यात आले आहेत.

ब्रिजभूषण यांच्याकडून रविवारी विशेष बैठकीचे आयोजन पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आले होते. या बैठकीला भारतीय कुस्ती संघटनेशी संलग्न २५ पैकी २२ सदस्य प्रतिनिधींची उपस्थिती होती. यानंतर बृजभूषण यांनी आपले प्रतिनिधी भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुकीत उभे राहणार असल्याचेही स्पष्ट केले होते. सोमवारी त्यांच्या प्रतिनिधींनी उमेदवारी अर्ज भरले.

कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीत नाही : ब्रिजभूषण

येत्या १२ ऑगस्ट रोजी भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक रंगणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै (सोमवार) ही होती. याच पार्श्वभूमीवर ब्रिजभूषण म्हणाले, २२ राज्य संघटनांमधील प्रतिनिधी येथे उपस्थित आहेत.

या सर्वांसोबत माझे बोलणे झाले आहे. आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. प्रतिनिधींनी अर्ज भरला आहे, पण माझ्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने उमेदवारी अर्ज भरलेला नाही. माझ्या कुटुंबातील एकही व्यक्ती निवडणूक लढवणार नाही, असे ब्रिजभूषण याप्रसंगी म्हणाले.

आसाम, ओडिशाचा विरोध

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या गटाला काही राज्यांचा विरोध आहे. यामध्ये आसाम, ओडिशा व हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे. नवी दिल्लीत विरोधकांचीही बैठक पार पडली. त्यांच्याकडून ब्रिजभूषण यांच्या गटाच्या विरोधात आपले प्रतिनिधी उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.