Wrestlers Protest: "छातीवर गोळ्या झेलू, पाठीवर नाही!" रिटायर्ड IPS ऑफिसरच्या धमकीवर बजरंग गरजला!

गोळी मारण्याची भाषा करणाऱ्या माजी आयपीएस अधिकाऱ्याला बजरंग भिडला
Wrestlers Protest
Wrestlers Protest
Updated on

Wrestlers Protest : आंदोलनाला बसलेल्या पैलवानांच्या प्रदर्शनाला रविवारी मोठे वळण आले. खेळाडूंना नवीन संसदेवर ब्रिजभूषण शरण सिंह विरुद्ध महापंचायत करायची होती पण ते होऊ शकले नाही. दिल्ली पोलिसांनी या सर्व खेळाडूंना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत सर्वांना सोडण्यात आले.

यानंतर कुस्तीपटूंनी सोशल मीडियावर आपल्या तक्रारी मांडण्यास सुरुवात केली. दरम्यान, एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने कुस्तीपटूंबद्दल असे ट्विट केले की बजरंग पुनिया स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने ट्विटरवरच सडेतोड उत्तर दिले.

Wrestlers Protest
IND vs AUS: WTC फायनलसाठी शेवटच्या क्षणी बदलला संघ! ICC ने दोन्ही संघांची केले घोषणा

निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. एन.सी. अस्थाना नावाच्या यांच्या अकाउंटवरून एक ट्विट आले. ट्विटमध्ये अस्थाना यांनी एक बातमी शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, 'गरज पडल्यास आम्ही शूट करू. पण तुझ्या म्हणण्यामुळे नाही. सध्या तो फक्त कचऱ्याच्या पोत्यासारखा ओढून फेकला गेला आहे. कलम 129 पोलिसांना गोळ्या घालण्याचा अधिकार देते. योग्य परिस्थितीत, ती इच्छा देखील पूर्ण होईल. पण हे जाणून घेण्यासाठी शिक्षित असणे आवश्यक आहे. पोस्टमॉर्टम टेबलवर पुन्हा भेटू!

Wrestlers Protest
Wrestlers Protest : 'आमच्या ऍथलीट्सचे फोटो पाहून मला...' पोलिसांच्या क्रूर वागणुकीनंतर इरफान पठाण ट्विट व्हायरल

अस्थाना यांची ही धमकी बजरंग पुनिया यांना अजिबात आवडली नाही. त्यांनी अस्थाना यांच्या ट्विटला उत्तर देत लिहिले की, 'हे आयपीएस अधिकारी आम्हाला गोळ्या घालण्याबाबत बोलत आहेत. भाऊ समोर उभा आहे, मला सांग कुठे गोळी मारायला यायचं… मी शपथ घेतो, मी पाठ दाखवणार नाही, तुझ्या गोळी छातीवरची खाईन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.