Wrestlers Protest : मी जर राजीनामा दिला तर कुस्तीपटूंचे... एवढं होऊनही बृजभूषण सिंहांना खुर्ची सुटेना

Wrestlers Protest Brij Bhushan Sharan Singh
Wrestlers Protest Brij Bhushan Sharan Singhesakal
Updated on

Wrestlers Protest Brij Bhushan Sharan Singh : भारताचे ऑलिम्पिक पदक विजेते कुस्तीपटू बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचे आरोप करत रस्त्यावर आंदोलनाला बसले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिल्ली पोलीसांनी भारतीय कुस्ती परिषदेचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली. मात्र तरी देखील बृज भूषण शरण सिंह यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्यास तुर्तास तरी नकार दिला आहे.

Wrestlers Protest Brij Bhushan Sharan Singh
KKR vs GT : गुजरातने कोलकात्याचे आव्हान 18 व्या षटकातच केले पार

शुक्रवारी दिल्ली पोलीसांनी सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर भारतीय कुस्ती परिषदचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली. यानंतर बृजभूषण शरण सिंह पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, 'राजीनामा देणे ही काही मोठी गोष्ट नाही. मात्र मी काही गुन्हेगार नाही.'

'जर मी राजीनामा दिला तर त्याचा अर्थ मी कुस्तीपटूंचे आरोप मान्य केले असं होईल. माझा कार्यकाळ जवळपास संपत आला आहे. सरकारने तीन सदस्यांची समिती नेमली आहे. येत्या 45 दिवसात निवडणुका होतील. निवडणुकांनंतर माझा कार्यकाळ संपुष्टात येईल.'

बृजभूषण पुढे म्हणाले की, 'प्रत्येक दिवशी हे कुस्तीपटू एक वेगळी मागणी घेऊन येत आहेत. त्यांनी एफआयआरची मागणी केली एफआयआर दाखल झाली. आता ते मला जेलमध्ये पाठवा आणि राजीनामा घ्या अशी मागणी करत आहेत. मी माझ्या मतदार संघातील लोकांमुळे खासदार आहे विनेश फोगाटमुळे मी खासदार झालो नाही. सध्या फक्त एक कुटुंब आणि आखाडा आंदोलन करत आहे. हरियाणातील 90 टक्के कुस्तीपटू माझ्या बाजूने आहेत.'

Wrestlers Protest Brij Bhushan Sharan Singh
''मी निर्दोष, न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास...'', FIR दाखल केल्यानंतर ब्रिजभूषण यांची प्रतिक्रिया

'या आंदोलनापूर्वी ते माझे गुणगाण करत होते, त्यांच्या लग्नसमारंभात बोलवत होते. माझ्यासोबत फोटो काढत होते. माझे आशीर्वाद घेत होते. त्यांनी 12 वर्षे कोणत्याही पोलीस ठाण्यात, क्रीडा मंत्रालयाकडे किंवा फेडरेशनकडे लैंगिक अत्याचाराची तक्रार केली नव्हती.'

आज सकाळी काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी यांना जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची भेट घेतली होती. यावर बृजभूषण म्हणाले की, 'मी सुरूवातीपासूनच सांगत होतो की काही उद्योगपती आणि काँग्रेस या आंदोलनाच्या पाठीमागे आहे.'

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()