Wrestlers Protest : 2 कुस्तीपटू, 1 रेफरी, 1 कोच यांनी दिली विरोधात साक्ष, ब्रिजभूषण पुरते अडकले?

Wrestlers Protest
Wrestlers Protestsakal
Updated on

Wrestlers Protest : एक ऑलिम्पियन, एक राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू, एक आंतरराष्ट्रीय रेफरी आणि राज्यस्तरीय कोच यांनी भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कुस्तीपटूंच्या आरोपांना पुष्टी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात चार राज्यांतील 125 संभाव्य साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यापैकी हे 4 जण आहेत.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, 28 एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवले होते. लैंगिक अत्याचाराची 15 तर अयोग्य ठिकाणी स्पर्शाची 10 प्रकरणे आहेत.

दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्या सुमन नलवा यांना या चार साक्षीदारांबद्दल विचारले असता सांगितले की, आम्ही या प्रकरणात तपास किंवा पुराव्यावर भाष्य करू शकत नाही. अजूनही तपास सुरू आहे. एसआयटी या प्रकरणाची चौकशी करत असून, न्यायालयाला अहवाल सादर केला जाईल.

Wrestlers Protest
WTC 2023 Final : रोहित शर्मासमोर मोठं संकट! प्लेइंग इलेव्हनमधून कोणाचा पत्ता करणार कट

तक्रारकर्त्यांपैकी एकाच्या प्रशिक्षकाने सांगितले की, कुस्तीपटूने ब्रिजभूषण यांना घटनेच्या 6 तासांनंतरच फोनवरून माहिती दिली. दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान दोन महिला कुस्तीपटू, एक ऑलिम्पियन आणि दुसरी कॉमनवेल्थ गेम्स पदक विजेती, यांनी कुस्तीपटूंच्या दाव्याला पुष्टी दिली. तक्रारदाराने लैंगिक छळाच्या घटनांची माहिती एका महिन्यानंतरच दिली होती असे द इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या माहितीत त्यांनी सांगितले आहे.

रेफ्री हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सर्किटमध्ये मोठे नाव आहे. त्याने दिल्ली पोलिसांना सांगितले की, जेव्हा तो स्पर्धांसाठी देश-विदेशात जायचा तेव्हा महिला कुस्तीपटूंची ही अवस्था मला कळायची.

दिल्ली पोलिसांनी महिला पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश असलेले एक विशेष तपास पथक स्थापन केले, ज्याने लैंगिक छळाच्या घटना घडल्या त्या स्पर्धेत उपस्थित असलेल्यांबद्दल WFI कडून माहिती मागवली.

Wrestlers Protest
Ruturaj Gaikwad: भावा वहिनीनी जिंकले मन! ऋतुराजच्या होणाऱ्या पत्नीने मैदानात धोनीच्या पडल्या पाया अन्...

दिल्ली पोलिसांनी बॉक्सर मेरी कोमच्या अध्यक्षतेखालील सरकारने नियुक्त केलेल्या निरीक्षण समितीचा अहवाल देखील सादर केला आहे, जी ब्रिजभूषणविरुद्ध लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आली होती.

सूत्राने सांगितले की, एसआयटीने 158 लोकांची यादी तयार केली होती आणि त्यांनी पुरावे गोळा करण्यासाठी हरियाणा, उत्तर प्रदेश, झारखंड आणि कर्नाटकला भेटी दिल्या. आतापर्यंत त्यांनी 125 जणांचे जबाब नोंदवले असून त्यापैकी चार महिलांनी त्यांच्या जबाबात कुस्तीपटूंच्या आरोपांना पुष्टी दिली आहे.

Wrestlers Protest
Sex Tournament : बाबो.. आता होणार सेक्सची चँपियनशीप स्पर्धा! असे आहेत १६ चित्रविचित्र नियम

एफआयआर नोंदविल्यानंतर एसआयटीने ब्रिजभूषण सिंह यांची दोनदा चौकशी केली आणि दोन्ही प्रसंगी त्याने सहभाग असल्याला दावा नाकारला. एसआयटीने डब्ल्यूएफआयचे आउटगोइंग सेक्रेटरी विनोद तोमर यांचीही तीन ते चार तास चौकशी केली, ज्यांचे नाव एफआयआरमध्ये सहा प्रौढ कुस्तीपटूंनी दिले आहे.

सूत्राने सांगितले की, “आतापर्यंत, सर्व सहा महिला कुस्तीपटू आणि एका अल्पवयीन तक्रारदाराने त्यांच्या तक्रारींमध्ये केलेल्या आरोपांची पुष्टी करून कलम 164 अंतर्गत दंडाधिकार्‍यांसमोर त्यांचे जबाब नोंदवले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()