Wrestlers Protest: अखेर कुस्तीपटूंचं आंदोलन मागे, ब्रिजभूषण यांच्या बाबत मोठा निर्णय

Wrestlers Protest Updates
Wrestlers Protest Updates
Updated on

Wrestlers Protest Updates : भारतीय कुस्ती फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिजभूषण सरन सिंग यांच्या विरोधात संपावर गेलेल्या कुस्तीपटूंनी शुक्रवारी उशिरा केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी चर्चा केल्यानंतर आंदोलन मागे घेतले. ब्रिजभूषण सरन सिंग यांच्यावर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाराच्या आरोपानंतर भारतीय ऑलिंपिक संघटनेने सात सदस्यांची चौकशी समिती स्थापन केली. या समितीला चार आठवड्यात तपास पूर्ण करून अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालाच्या आधारे सरकार अंतिम निर्णय घेईल.

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलक कुस्तीपटूंसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, बैठकीत खेळाडूंनी आपल्या मागण्या मांडल्या आणि त्यावर आम्ही चर्चा केली. जेव्हा हे आरोप झाले तेव्हा आम्ही भारतीय कुस्ती महासंघाला (WFI) नोटीस बजावली होती आणि त्यांना 72 तासांच्या आत उत्तर देण्यास सांगितले होते.

Wrestlers Protest Updates
IND vs NZ: टीम इंडियाला लागली चिंता! ‘डेथ ओव्हर’ गोलंदाजीचा प्रश्न काय सुटेना

ब्रिजभूषण चौकशी होईपर्यंत पदावरून होणार पायउतार

केंद्रीय क्रीडा मंत्र्यांनी सांगितले की, एक तपासणी समिती गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची नावे शनिवारी जाहीर केली जातील. ही समिती चार आठवड्यांत आपली चौकशी पूर्ण करेल. कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंग हे चार आठवड्यांसाठी भारतीय कुस्ती महासंघापासून दूर राहतील आणि जोपर्यंत तपासणी समितीची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत ते चौकशीत सामील होतील. त्याच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक छळाच्या आरोपांची देखरेख समिती पाहणार आहे.

Wrestlers Protest Updates
बृजभूषण सिंहांच्या समर्थनार्थ ३ वेळचा महाराष्ट्र केसरी पैलवान आखाड्यात; म्हणाला, हे तर…

आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी काल भारतीय ऑलिंपिक संघटनेकडे ब्रिजभूषण यांच्याविरोधात तक्रार केली. पी. टी. उषा अध्यक्ष असलेल्या समितीने ऑलिंपिक सुवर्णपदक विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा, ऑलिंपिक ब्राँझपदक विजेता योगेश्वर दत्त, स्वतः उषा आणि सचिव कल्याण चौबे यांच्या कार्यकारी समितीची तातडीची बैठक झाली आणि त्यांनी चौकशी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.

कोणावरही अन्याय केला जाणार नाही. चौकशी समिती निःपक्षपणे चौकशी करेल आणि त्यातून सत्य बाहेर आणले जाईल, असे उषा यांनी बैठकीनंतर सांगितले. दिल्लीतील जंतर-मंतर येथे धरणे धरणाऱ्या आंतरराष्ट्रीय कुस्तीपटूंनी पी. टी. उषा यांच्या नावाने पत्रच लिहिले होते भारतीय कुस्ती महासंघात राष्ट्रीय प्रशिक्षक शिबिरासाठी प्रशिक्षक आणि क्रीडा वैद्यकीय स्टाफ नेमणुकीवरून निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.