Wrestlers Protests : 'आम्हाला धमकी...', साक्षीच्या दाव्यावर अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी ब्रिजभूषण यांची केली पाठराखण

Wrestlers Protest
Wrestlers ProtestSAKAL
Updated on

Wrestlers Protests : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणार्‍या भारतीय कुस्तीपटूंपैकी एक साक्षी मलिक यांनी शनिवारी एक व्हिडिओ शेअर केला. ज्यामध्ये त्यांनी दावा केला की अल्पवयीन कुस्तीपटूने प्रथम त्यांचे म्हणणे रेकॉर्ड केले परंतु नंतर ते बदलले. कदाचित त्याच्यावर कसला तरी दबाव आणला गेला असावा आणि त्याच्या कुटुंबाला धमकावले गेले असावे.

Wrestlers Protest
Cricket News : 8 महिन्यांनंतर या खेळाडूची टी-20 संघात एंन्ट्री! निवडकर्त्यांनी घेतला मोठा निर्णय

साक्षी मलिकने दिलेल्या या विधानाच्या एका दिवसानंतर म्हणजेच रविवारी अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांचे वक्तव्य समोर आले आहे, त्यांनी ते खोटे असल्याचे म्हटले. या अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांचे म्हणणे आहे की, त्याच्या कुटुंबावर कोणताही दबाव आणला गेला नाही किंवा त्याला कोणत्याही प्रकारे धमकावले गेले नाही.

Wrestlers Protest
WI vs IND : WTC पराभवानंतर पुजाराने घेतला मोठा निर्णय! वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर सोडणार टीम इंडियाची साथ

आज तकशी बोलताना अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांच्या कुटुंबाला कोणतीही धमकी मिळाली नाही किंवा त्यांच्या मुलीवर तिचे विधान बदलण्यासाठी कोणताही दबाव आणला गेला नाही. आम्हाला जे करायचे होते ते आम्ही केले आणि आमच्या कुटुंबाला धमकावण्यात आले या विधानात तथ्य नाही.

दुसरीकडे साक्षी मलिकने जारी केलेल्या व्हिडीओमध्ये तिचे पती सत्यव्रत कादियान म्हणाले होते की, आमचे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित नव्हते आणि त्यात काँग्रेसचाही सहभाग नव्हता. यापूर्वीही आम्हाला ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करायचे होते, पण कुस्तीपटूंमध्ये एकजूट नसल्याने ते होत नव्हते. कोणत्याही कुस्तीपटूने त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या कारकिर्दीला अडचणी येऊ लागल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.