WFI Election : बुडत्याचा पाय खोलात... भारतीय कुस्ती महासंघाला सर्वोच्च न्यायालयातही बसला धक्का

Wrestling Federation Of India Election
Wrestling Federation Of India Election esakal
Updated on

Wrestling Federation Of India Election : सर्वोच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाला मोठा धक्का दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीवरील स्थगिती हटवण्यास नकार दिला. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाची निवडणूक घेण्यावर 28 ऑगस्ट पर्यंत स्थगिती दिली आहे.

Wrestling Federation Of India Election
Virat Kohli : 2011 चा वर्ल्डकप जिंकला मात्र त्याचं महत्व... विराट कोहलीनं केलं मोठं वक्तव्य

जागतिक कुस्ती संघटना UWW ने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुका वेळेत न झाल्याने त्यांची मान्यता रद्द केली होती. जागतिक कुस्ती संघटनेच्या या निर्णयामुळे भारताच्या कुस्तीपटूंना आता आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तसेच आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारतीय ध्वजाखाली खेळता येणार नाही.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती अभय एस ओक आणि न्यायमूर्ती पंकज मिथल यांच्या बेंचने याचिकाकर्ता आंध्रप्रदेश कुस्ती परिषदेला उच्च न्यायालयात दाद मागण्यास सांगितले. उच्च न्यायालयाने याचिकाकर्ता पक्षकार होण्यासाठी याचिका दाखल करणार असेल तर या प्रकरणाला नक्कीच प्राथमिकता दिली जाईल असेही सांगितले.

Wrestling Federation Of India Election
Igor Stimac : मी इथं चाटूगिरी करण्यासाठी आलो नाही... भारतीय फुटबॉल संघाचे कोच एवढे का भडकले?

हरियाणा कुस्ती परिषदेच्या प्रतिनिधींच्या मताधिकाराला आव्हान देणारी याचिका पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात दाखल झाली होती. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीला 28 ऑगस्टपर्यंत स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने आता आंध्रप्रदेश कुस्ती परिषदेला उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. त्यावेळी ते म्हणाले की या प्रकरणी आम्ही सुनावणी का करावी? तुम्ही उच्च न्यायालयात जावा.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.