WFI Elections 2023: कुस्ती महासंघाच्या निवडणुकीसंदर्भात मोठी अपडेट; मतदानाची तारीख ढकलली पुढे

Wrestling Federation Elections
Wrestling Federation ElectionsESAKAL
Updated on

Wrestling Federation Elections : भारतीय ऑलिम्पिक संघटनेने कुस्ती महासंघ निवडणुकीच्या तारखा बदलल्या आहेत. याआधी कुस्ती महासंघाच्या निवडणुका 6 जुलैला होणार होत्या, मात्र आता या निवडणुका 11 जुलैला होणार आहेत. आयओएच्या समितीने पाच अवैध राज्य घटकांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणुकांच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

Wrestling Federation Elections
WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल! ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय अन् भारताचे मोठे नुकसान?

कुस्ती महासंघाच्या निवडणुकीचा निकालही 11 जुलैलाच जाहीर होणार आहे. महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या पाच राज्यांनी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एमएम कुमार यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय समितीकडे संपर्क साधला. या पाच जणांना WFI कडून मान्यता मिळालेली नाही.

कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी करत देशातील प्रसिद्ध कुस्तीपटूंनी निदर्शने केली होती. यादरम्यान दिल्लीतील जंतरमंतरवर कुस्तीपटू धरणे धरत बसले होते. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर अनेक महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. ज्यासाठी दिल्ली पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवले होते.

गेल्या आठवड्यात पोलिसांनी या प्रकरणी आरोपपत्रही दाखल केले होते. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून आश्वासन मिळाल्यानंतर खेळाडूंनी आंदोलन स्थगित केले. 15 जूनपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे खेळाडूंवर दाखल करण्यात आलेला एफआयआर मागे घेण्याचे आणि कुस्ती संघटनेच्या निवडणुका लवकरच घेण्याचे आश्वासन सरकारने खेळाडूंना दिले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.