WFI Sanjay Singh : समितीला आम्ही मानतच नाही... संजय सिंह थेट क्रीडा मंत्रालयालाच भिडले

Wrestling Federation Of India
Wrestling Federation Of Indiaesakal
Updated on

Wrestling Federation Of India : भारतीय कुस्ती परिषदेचा वाद काही संपवण्याचं नाव घेत नाहीये. अब WFI चे निलंबित अध्यक्ष संजय सिंह यांनी सांगितले की, ते अॅड हॉक समिती आणि क्रीडा मंत्रालयाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईला मानतच नाहीत. आम्ही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा भरवणार आहोत.

भारतीय कुस्ती परिषदेची (WFI) निवडणूक झाल्यानंतर तिसऱ्याच दिवशी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने नवीन निवडून आलेली WFI ची समितीच निलंबित केली होती. त्यानंतर भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या सांगण्यावरून तीन सदस्यांची समिती स्थापन केली. याचे अध्यक्षपद भुपेंद्र सिंह बाजवा यांच्याकडे आहे.

Wrestling Federation Of India
Harmanpreet Kaur : ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेत व्हाईट वॉश अन् हरमनच्या नावावर झाला अप्रिय विक्रम

क्रीडा मंत्रालय आणि ऑलिम्पिक असोसिएशनने नियुक्त केलेल्या अॅड हॉक समितीत माजी हॉकीपटू एम एम सोमय्या आणि माजी बॅडमिंटनपटू मंजूशा कंवर यांचा समावेश आहे. या समितीने वरिष्ठ गट राष्ट्रीय चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धा ही दोन ते पाच फेब्रुवारी दरम्यान जयपूरमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं.

दरम्यान संजय सिंह यांनी सांगितले की, 'आमची निवड ही लोकशाही पद्धतीने झाली आहे. निवडणूक अधिकाऱ्याने कागदावर सही केली आहे. त्याकडे तुम्ही कसं दुर्लक्ष करू शकता. आम्ही या अॅड हॉक समितीला मानतच नाही.'

Wrestling Federation Of India
T20 World Cup 2024 : विराट - रोहित टी 20 साठी उत्सुक; बीसीसीआयने निर्णय ढकलला पुढं?

राष्ट्रीय चॅम्पियशिपबद्दल संजय सिंह यांना विचारण्यात आलं त्यावेळी त्यांनी, आम्ही या निलंबन कारवाईला मानतच नाही. WFI चांगल्या पद्धतीनं काम करत आहे. आमच्या राज्य संघटनांचे संघच त्या स्पर्धेत भाग घेणार नसतील तर अॅड हॉक समिती राष्ट्रीय चॅम्पियनशिपचे आयोजन कसं करेल. आम्ही लवकरच कार्यकारी समितीची बैठक बोलावणार आहोत. याची नोटिस एक - दोन दिवसात दिली जाईल.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.