कुस्तीसाठी हंगामी समितीची स्थापना; भूपिंदर बाजवा, सोमाया, मंजूषा यांचा समावेश

भारतीय वुशू संघटनेचे अध्यक्ष भूपिंदरसिंह बाजवा यांच्याकडे या समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली
wrestling temporary body committee bhupinder bajwa and mm soumya manjusha kanwar
wrestling temporary body committee bhupinder bajwa and mm soumya manjusha kanwarsakal
Updated on

नवी दिल्ली : भारतीय कुस्ती संघटनेचे दैनंदिन कामकाज सांभाळण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून (आयओए) तीन सदस्यीय हंगामी समितीची स्थापना करण्यात आली आहे. भारतीय वुशू संघटनेचे अध्यक्ष भूपिंदरसिंह बाजवा यांच्याकडे या समितीच्या प्रमुखपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

तसेच हॉकी खेळातील ऑलिंपियन एम. एम. सोमाया व देशाची माजी बॅडमिंटन खेळाडू मंजूषा कंवर या दोघांचाही या समितीत समावेश आहे. आयओएच्या अध्यक्षा पी.टी.उषा यांच्याकडून याप्रसंगी स्पष्ट करण्यात आले की,

भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक पार पडली. पण यामध्ये संघटनेच्याच नियमांचे पालन करण्यात आले नाही. भारतीय ऑलिंपिक समितीच्या नियमांकडेही दुर्लक्ष करण्यात आले. आता कुस्ती संघटनेत पारदर्शकता, निष्पक्षता यावी यासाठी आणि खेळाडूंच्या हितासाठी हंगामी समितीची स्थापना करण्यात आली आहे.

हंगामी समितीची जबाबदारी

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून आयओएला हंगामी समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले होते. आता आयओएकडून हंगामी समितीची स्थापना करण्यात आली आहे. खेळाडूंचा सहभाग, निवड प्रकिया, आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी योजना व क्रीडा उपक्रम नीट सुरू राहणे यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर त्यांना लक्ष द्यावे लागणार आहे.

मागील समितीतही बाजवा यांचा समावेश

आयओएकडून एप्रिल महिन्यातही हंगामी समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या वेळीही भूपिंदर बाजवा यांचा हंगामी समितीत समावेश करण्यात आला होता. न्यायालयाकडून स्थगिती मिळाल्यानंतर २१ डिसेंबरला भारतीय कुस्ती संघटनेची निवडणूक पार पडली.

मूळ प्रकरण

भारतातील काही कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण शरणसिंह यांच्याविरुद्ध लैंगिक शोषणाचा आरोप केला. त्यानंतर आंदोलनही करण्यात आले. यामुळे भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुकीला विलंब झाला. अखेर काही दिवसांनंतर ही निवडणूक पार पडली. पण ब्रिजभूषण संबंधित संजयसिंह हे अध्यक्षपदासाठी निवडून आल्यानंतर पुन्हा कुस्तीपटूंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. अखेर केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून नव्या कार्यकारिणीला निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.