India vs Australia : पावसाने WTC Final मध्ये देखील खेळ केला तर काय... कोण होणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन?

India vs Australia WTC Final Rain Weather Update
India vs Australia WTC Final Rain Weather Update esakal
Updated on

India vs Australia WTC Final Rain Weather Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील WTC Final 2023 ची फायनल 7 जूनपासून इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर सुरू होत आहे. सामना इंग्लंडच्या लंडन शहरात होत असल्याने हवामानाबाबत कोणतीही शाश्वती देता येत नाही. सामन्यात कधीही पाऊस पडू शकतो. नुकत्याच झालेल्या आयपीएल 2023 च्या फायनलमध्ये देखील पावसाने खेळ केला होता. राखीव दिवशी देखील पाऊस आल्याने सामन्याची षटके कमी करावी लागली होती.

त्यामुळेच भारतीय क्रिकेट चाहत्यांना कधीही पाऊस पडणाऱ्या इंग्लंडमध्ये होत असलेल्या WTC Final ची चिंता लागून राहिली आहे. गेल्या WTC Final फायनलमध्ये देखील पावसाने खेळ केला होता.

India vs Australia WTC Final Rain Weather Update
Anil Kumble Ambati Rayudu : ती तर मोठी चूक... रायुडूने निवृत्ती घेताच कुंबळेने जखमेवर चोळले मीठ

जर केनिंगटन ओवलच्या मैदानावर होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलवर पावसाचे पाणी फिरले, किंवा सामन्याचा निकाल लागला नाही, 7 ते 11 जूनदरम्यान कोणत्याही दिवशी पाऊस पडला तरी 12 जूनला सामना खेळवला जाईल. जर 12 जूनला देखील सामन्याचा निकाल लागावा यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.

सामन्यात पावसाचा व्यत्यय आल्यास कोण होणार विजेता?

पावसामुळे जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा निकाल लागला नाही, 12 जूनला राखीव दिवशी देखील निकाल लागला नाही तर आयसीसी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोघांना संयुक्तरित्या विजेतेपद देईळ. आयसीसीने पहिल्यापासूनच 12 जून हा राखीव दिवस ठवला आहे. जर सामन्यात पावसाचा व्यत्यय आला तर सामन्याचा निकाल 12 जूनला लागावा. जर असे झाले नाही तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांना संयुक्तरित्या विजेतेपद दिले जाईल.

India vs Australia WTC Final Rain Weather Update
IND vs AUS: WTC फायनलमध्ये हा खेळाडू रोहितसोबत करणार ओपनिंग! शुभमन गिलचा पत्ता कट?

भारताचा संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रविंद्र जडेजा, इशान किशन, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलियाचा संघ :

पॅट कमिन्स, डेव्हिड वॉर्नर, ट्रॅविस हेड, उस्मान ख्वाजा, स्टीव स्मिथ, कॅमरून ग्रीन, मार्कस हॅरिस, मार्नस लाबुशेन, एलेक्स कॅरी, जॉश इंगलिस, स्कॉट बोलँड, जॉश हेजलवूड, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, मिशेल स्टार्क.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.