VIDEO : गिल झाला 'सुपर मॅन', टेलरचा घेतला अफलातून कॅच

शुभमन गिलने सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत रॉस टेलरला तंबूत धाडले
IND VS NZ
IND VS NZTwitter
Updated on

INDvsNZ WTC Final Gill Takes Stunning Catch : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल साउदम्टनच्या मैदानात सुरु आहे. पावासमुळे अधिक खेळ वाया गेल्यामुळे सामना अनिर्णित राहण्याचे संकेत असताना टीम इंडिया मॅच बनवण्यासाठी चांगेल प्रयत्न करताना दिसते. न्यूझीलंडने 2 बाद 101 धावांवरुन खेळाला सुरुवात केली. कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर या जोडीने स्विंग होणाऱ्या चेंडूवर सावध पवित्रा घेतला. धावा करण्यापेक्षा मैदानात तग धरुन त्यांनी भारतीय गोलंदाजांना हताश केले. पण अखेर मोहम्मद शमीने ही जोडी फोडून भारताला मोठा दिलासा दिला. या विकेटमध्ये शुभमन गिलने मोलाचा वाटा उचलला.

IND VS NZ
VIDEO : विराट गारठला! रोहितने कशी दिली रिअ‍ॅक्शन पाहाच

पाचव्या दिवसातील 14 व्या षटकांपर्यंत भारतीय गोलंदाजांनी कसून मारा केला. खूप मेहनत घेतली. पण त्यांना विकेट मिळत नव्हती. अखेरच मोहम्मद शमीने रॉस टेलरची तपस्या भंग केली. शमीने टेलरला ड्राइव्ह खेळण्यास निमंत्रित केले. त्याने यावर चांगला शॉट्सही खेळला. पण शुभमन गिलने सर्वोत्तम क्षेत्ररक्षणाचा नजराणा दाखवून देत रॉस टेलरला तंबूत धाडले. शॉर्ट कव्हरमध्ये शुभमन गिलने घेतलेल्या अप्रितम झेलमुळे केन विल्यमसन आणि रॉस टेलर जोडी फोडण्यात शमीला आणि टीम इंडियाला यश मिळाले.

शमीने टीम इंडियाला पाचव्या दिवसातील पहिले आणि न्यूझीलंडला तिसरा धक्का दिला. ही जोडी फुटल्यानंतर न्यूझीलंडने ठराविक अंतराने एका मागून एक अशा दोन विकेट गमावल्या. ईशांत शर्माने हेन्री निकोलसला अवघ्या 7 धावांवर माघारी धाडले. स्लिपमध्ये रोहित शर्माने त्याचा कॅच घेतला. त्यानंतर शमीने एका अप्रतिम चेंडूवर बीजे वॉटलिंगला बोल्ड केले. या विकेट्समुळे न्यूझीलंडने लंचपूर्वीच अर्धा संघ तंबूत परतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.