WTC India Defeat Memes : 'या चिमण्यांनो परत फिरा रे!' छान खेळलात, भारतात निघून या, नेटकऱ्यांनी झापले

सोशल मीडियावरुन टीम इंडियावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. ते म्हणजे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून झालेला दारुण पराभव.
WTC Finals 2023 India Lost Austraila Beat Rohit Sharma
WTC Finals 2023 India Lost Austraila Beat Rohit Sharma esakal
Updated on

WTC Finals 2023 India Lost Austraila Beat Rohit : सोशल मीडियावरुन टीम इंडियावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. ते म्हणजे टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाकडून झालेला दारुण पराभव. काहीही झालं तरी टीम इंडिया यंदाच्या डब्ल्यु टी सी स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करणार असे बोलले जात होते. मात्र आता कांगारुंनी भारताचे पानिपत केले आहे.

भारतीय संघाचा पराभव हा चाहत्यांच्या, किक्रेटप्रेमींच्या जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच की काय त्यांनी सोशल मीडियावर टीम इंडियाच्या खेळाडूंवर चांगलीच आगपाखड केली आहे. नेहमीप्रमाणे एक दोन खेळाडू खेळतात आणि बाकीचे हजेरी लावून जातात. अशा प्रकारचे मीम्स व्हायरल झाले आहेत. काहींनी तुम्ही फक्त आय़पीएलमध्येच चमकता बाकीच्या स्पर्धांमध्ये तुम्हाला काही खेळता येत नाही. हे तुम्हीच दाखवून दिले आहे.

Also Read - Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

नेटकऱ्यांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा ते चेतेश्वर पुजारा यासगळ्यांना तिखट शब्दांत सुनावले आहे. रोहितच अपयश हे आता क्रिकेटप्रेमींना खूपताना दिसत आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून त्याचा फॉर्म हे टीम इंडियासाठी चिंतेचे कारण ठरत आहे. अशावेळी त्यानं थोडी मोठी का होईना खेळी करावी असे चाहत्यांचे म्हणणे होते. मात्र शर्मा पुन्हा एकदा स्वस्तात बाद झाल्याचे दिसून आले. त्याची खेळी पाहून नेटकरी कमालीचे संतापले आहेत.

कोहलीकडून देखील क्रिकेटप्रेमींना खूप साऱ्या अपेक्षा होत्या. मात्र त्यानंही निराशा केली. भलेही टीम इंडिया जिंकणार नाही याची खात्री झाल्यानंतर त्यांनी सामना अनिर्णित कसा राहील याचा प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र तसेही झाले नाही.

भारतीय संघाकडून कोणत्याही प्रकारे लढत दिल्याचे दिसून आले नाही. अतिशय स्वस्तात फलंदाज बाद झाले. आणि शेवटच्या फळीतील फलंदाजांकडून कोणत्याही प्रकारे अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही. अशा आशयाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

WTC Finals 2023 India Lost Austraila Beat Rohit Sharma
Ind vs Aus WTC Final Day 5 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गदा ऑस्ट्रेलियाकडे; भारताची पुन्हा हाराकिरी

ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव करत जागतिक कसोटी अजिंक्यपदाचा मान मिरवला आहे. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर चौथ्या डावात विजयासाठी 444 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला आपल्या दुसऱ्या डावात 234 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताने सलग दुसऱ्यांदा WTC च्या फायनलमध्ये धडक मारली खरी पण त्यांच्या वाट्याला पराभव आला आहे.

WTC Finals 2023 India Lost Austraila Beat Rohit Sharma
Ind vs Aus WTC Final: शुबमन गिल खरंच आऊट होता का? कॅमेरून ग्रीनने वादग्रस्त झेलवर तोडले मौन, म्हणाला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.