WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल! ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाचा इंग्लंडवर विजय अन् भारताचे मोठे नुकसान?

team India
team Indiasakal
Updated on

ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर खेळल्या गेला. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 209 धावांनी विजय मिळवला. त्याच वेळी अंतिम सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2023 ते 25 या वर्षाचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले.

2023-25 ​​वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा पहिला सामना इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. ज्यात ऑस्ट्रेलिया संघाने 2 विकेट्स राखून विजय मिळवला. ॲशेसमध्ये ऑस्ट्रेलियाच्या इंग्लंडवर विजयामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे.

team India
ICC Test Ranking Rishabh Pant : सहा महिन्यापासून संघाबाहेर तरी ऋषभ पंत वाचवतोय भारताची लाज

ऑस्ट्रेलिया हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा सध्याचा चॅम्पियन संघ आहे. 2023-25 ​​गुणांच्या टेबलवर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे कारण, अंतिम सामन्यानंतर 2023-25 ​​चा पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळला गेला. जे ऑस्ट्रेलियाने जिंकले आणि पॉइंट टेबलवर अजूनही पहिल्या स्थानावर आहे. तर इंग्लंडचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे. हा सामना फक्त ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये खेळला गेला आहे, ज्यामुळे हे दोन्ही संघ पॉइंट टेबलवर कब्जा करत आहेत.

team India
VIDEO: बॅट अन् हेल्मेट फेकलं अन्... कर्णधार पॅट कमिन्सनं थाटात साजरा केला कांगारूंचा विजय

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाने आता 2025 WTCच्या अंतिम सामन्याची तयारी सुरू केली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाला एकूण 19 सामने खेळायचे आहेत.

ज्यामध्ये टीम इंडियाला वेस्ट इंडिजविरुद्ध 2 कसोटी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 सामने, इंग्लंडसोबत 5 कसोटी, बांगलादेशसोबत 2 कसोटी, न्यूझीलंडसोबत 3 कसोटी आणि ऑस्ट्रेलियासोबत 5 कसोटी सामने खेळायचे आहेत. भारताने वेस्ट इंडिजकडून कसोटी मालिका गमावल्यास संघाचे मोठे नुकसान होऊ शकते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()