WTC पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ! ऑस्ट्रेलिया अन् टीम इंडियाला 'या' संघाने दिला झटका

WTC Points Table 2023-25 Update
WTC Points Table 2023-25 Updateेोकोत
Updated on

WTC Points Table 2023-25 Update : जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी 9 संघांमध्ये लढत सुरू आहे. WTC फायनलमध्ये फक्त पॉइंट टेबलमधील टॉप 2 संघांना संधी मिळते.

दरम्यान, डब्ल्यूटीसीच्या पॉइंट टेबलमध्ये भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना जिंकून दुस-या स्थानावर पोहोचले होते, पण आता पुन्हा एकदा ते टॉप 2 मधून बाहेर पडले आहे.

WTC Points Table 2023-25 Update
Sachin Dhas : बीडच्या सचिनचा 'तो' शॉट अन् चर्चा गुरु लक्ष्मणची, नेटप्रॅक्टिसमध्ये दिले धडे आले कामी...

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना किवी संघाने म्हणजेच न्यूझीलंडने 281 धावांनी जिंकला होता. या सामन्यातील विजयासह तो डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

न्यूझीलंड अव्वल स्थानावर आल्याने टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांची घसरण झाली. टीम इंडिया आता दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. तर ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर गेला आहे. न्यूझीलंडचा संघ आता अव्वल स्थानी पोहोचला आहे.

WTC Points Table 2023-25 Update
Sachin Dhas : सचिन... सचिन... वर्ल्ड सेमीफायनल मध्ये पुन्हा घुमला नारा, काय आहे बीडच्या सुपरस्टारच्या नावामागचं कारण?

डब्ल्यूटीसीच्या या सायकलमध्ये न्यूझीलंड संघ एकूण तीन सामने खेळला आहे. जिथे त्यांनी दोन सामने जिंकले आणि केवळ एका सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंड संघ 66.66 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. पहिल्या WTC फायनलचा चॅम्पियन संघ न्यूझीलंडने या सायकलमध्ये चांगली सुरुवात केली आहे. डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या सायकलमध्ये त्यांना सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.