विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धांमध्ये अव्वल स्थान (World Test Championship (2021-2023) points table) (2021-2023) मिळवलं आहे
नवी दिल्ली- विराट कोहलीच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धांमध्ये अव्वल स्थान (World Test Championship (2021-2023) points table) (2021-2023) मिळवलं आहे. पॉईंट टेबलमध्ये सर्वांधिक पॉईंटसह भारत पहिल्या क्रमांकावर आहे. तर पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज एकत्रितपणे दुसऱ्या स्थानावर आहेत. इंग्लंडविरोधातील कसोटी सामन्यांमध्ये भारताने चांगली कामगिरी करुन दाखवली. त्यामुळे भारताला अव्वल स्थान मिळण्यास मदत झालीये. (Cricket Latest News)
इंग्लंडविरोधातील दोन सामन्यांमध्ये केलेल्या कामगिरीमुळे सध्या भारताच्या नावे 14 पॉईंट्स आहेत. त्यामुळे भारतीय संघाचे PCT (percentage of points) 58.33 इतके झाले आहे. भारताने इंग्लंडविरोधातील पहिला कसोटी सामना जिंकला होता, तर दुसरा सामना अनिर्णित ठरला. इंग्लंड सध्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. इंग्लड संघाला अनिर्णित सामन्यामुळे दोन पॉईंट मिळाले आहेत.
पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजमध्ये दोन कसोटी सामने झाले. त्यात पाकिस्तान आणि वेस्ट इंडिजने प्रत्येकी एक-एक सामने जिंकले आहेत. पहिला कसोटी सामना वेस्ट इंडिजने जिंकला होता. त्यामुळे त्यांचे 12 पॉईंट्स झाले होते, पण दुसरा सामना पाकिस्तानने जिंकला. त्यामुळे त्यांचेही 12 पॉईंट्स झाले. पाकिस्तानने पाचव्या दिवशी वेस्ट इंडिजला 219 धावांवर रोखलं होतं. पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज सध्या पॉईंट टेबलमध्ये एकत्रितपणे दुसऱ्या स्थानावर आहेत, तर इंग्लंड चौथ्या स्थानी आहे.
दरम्यान, भारतीय संघ इंग्लंडविरूद्ध (Ind vs Eng 3rd Test) तिसरी कसोटी खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघात (Team India) काही बदल केला जाणार की नाही याविषयी चर्चा सुरू आहेत. विजयामुळे भारतीय संघांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना जिंकण्यासाठीच भारतीय संघ मैदानात उतरणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.