Roman reigns: WWE यूनिवर्सल चॅम्पियन रोमन रेंसचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे WWE पीपीवी (WWE Pay-Per-View TV program) मधील पहिल्या दिवसातील ब्रॉक लॅसनर विरुद्धची त्याली फाईट स्थगित करण्याची वेळ आली आहे. रेंसने ट्विटच्या माध्यमातून स्वत: यासंदर्भातील माहिती दिली आहे. नव्या वर्षात रोमन रेंस विरुद्ध ब्रॉक लॅसनर यांच्यातील लढतीची चाहत्यांना कमालीची उत्सुकता होती. यावर कोरोनानं पाणी फेरलं आहे. WWE ने दोघांमधील लढतीचे जोरदार प्रमोशन केले होते.
रोमन रेंसने ट्विटमध्ये लिहिलंय की, ' यूनिवर्सल चॅम्पियनशिप माझ्याकडे कायम ठेवण्यासाठी रात्री रिंगमध्ये उतरण्यासाठी उत्सुक होतो. पण दुर्देवानं कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Covid 19 Report Positive) आला आहे. कोविड प्रोटोकॉलनुसार, चाचणी करण्यात आली. त्यावेळी कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यामुळे स्पर्धेत भाग घेता येणार नाही. लवकरात लवकर रिंगमध्ये परतण्याचा प्रयत्न असेल, असा उल्लेख त्याने ट्विटमध्ये केलाय.
रोमन रेंसने कोरोनाच्या धास्तीमुळे WWE लाइव इवेंट्समधून माघार घेतली होती. त्याच्या अनुपस्थितीत द उसोज (WWEUsos) नं टॅग टीम चॅम्पियनशिप लढतीत प्रतिस्पर्ध्यांना धूल चारत चॅम्पियनशिप आपल्या नावे केली. WWE सध्या कोरोनाच्या सावटाखाली आहे. यात मंडे नाईट RAW कार्यक्रमाचाही समावेश आहे. सॅथ रॉलिन्स, बियांका ब्लेयर आणि बॅकी लिंच यासारख्या प्रमुख खेळाडूंना कोरोनाचा फटका बसला होता. माजी WWE चॅम्पियन सॅथ रॉलिन्स याने काही दिवसांपूर्वी ट्वीटच्या माध्यमातून कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.