Yashasvi Jaiswal : पदार्पणातच यशस्वी जैसवालची रँकिंगमध्ये 11 स्थानांची उडी, रोहितही फायद्यात

Yashasvi Jaiswal ICC Test Ranking
Yashasvi Jaiswal ICC Test Rankingesakal
Updated on

Yashasvi Jaiswal ICC Test Ranking : भारताचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैसवालने वेस्ट इंडीज विरूद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण केले. 21 वर्षाच्या युवा यशस्वी जैसवालने आपल्या पदार्पणाच्या कसोटीतच 171 धावांची दमदार खेळी करत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. त्याने या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत एक शतकी आणि एक अर्धशतकी खेळी केली.

यशस्वीला या दमदार कामगिरीचा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत मोठा फायदा झाला आहे. याचबरोबर यशस्वीसोबत सलामी देणारा कर्णधार रोहित शर्माने देखील शतक आणि अर्धशतकांचा रतीब घातला होता. तो देखील कसोटी रँकिंगमध्ये टॉप टेनमध्ये आला आहे. (Rohit Sharma ICC Test Ranking)

Yashasvi Jaiswal ICC Test Ranking
IND vs PAK Jay Shah : सुरक्षा एजन्सीचा अहवाल येताच जय शहांनी दिल्लीत बोलावली तातडीची बैठक

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताच्या दोन्ही सलामीवीरांनी दमदार कामगिरी केली. यशस्वी जैसवाल आणि रोहित शर्माने सलामी जोडी म्हणून आपल्या पहिल्याच कसोटी सामन्यात 229 धावांची सलामी दिली होती. यशस्वी जैसवालने 171 धावांची तर रोहित शर्माने 103 धावांची खेळी केली होती.

यानंतर या जोडीने दुसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात 139 धावांची सलामी दिली. यात यशस्वीचा वाटा 57 धावांचा होता. त्याने आपल्या पदार्पणाच्या मालिकेत पहिल्या कसोटीत शतकी तर दुसऱ्या कसोटीत अर्धशतकी खेळी करण्याचा कारनामा केला होता.

Yashasvi Jaiswal ICC Test Ranking
IND vs WI ODI Series : संघातील दिग्गज खेळाडू अचानक गायब... नव्या जर्सीच्या फोटोशूटवेळी मिळाले मोठे संकेत?

याच डावात रोहित शर्माने देखील 80 धावांची खेळी केली. त्यानंतर दुसऱ्या डावात देखील रोहित शर्माने 57 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर यशस्वी जैसवालने 37 धावा केल्या. मात्र या दोघांचा सलग तिसऱ्या डावात शतकी सलामी देण्याचा विक्रम अवघ्या 2 धावांनी हुकला.

भारताने विंडीजविरूद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 1 - 0 अशी जिंकली. दुसरा कसोटी सामना हा पावसामुळे ड्रॉ झाला. आता भारत विंडीजसोबत तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे.

वनडे मालिकेसाठीचा भारतीय संघ :

रोहित शर्मा, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, संजू सॅमसन, इशान किशन, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, उमरान मलिक, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.