Yashasvi Jaiswal WTC Final 2023 : पहिल्याच नेट सेशनमध्ये यशस्वीनं मैदान मारलं; Video होतोय व्हायरल

Yashasvi Jaiswal WTC Final 2023
Yashasvi Jaiswal WTC Final 2023esakal
Updated on

Yashasvi Jaiswal WTC Final 2023 : आयपीएलच्या 16 व्या हंगामाचा यंग सेंन्सेशन आणि उदयोन्मुख खेळाडू यशस्वी जैसवालला WTC Final ची लॉटरी लागली. ऋतुराज गायकवाडने तो लग्न करत असल्याने WTC Final साठी उपलब्ध नसल्याचे बीसीसीआयला कळवले. यानंतर बीसीसीआयने आयपीएलमध्ये धावांचा पाऊस पाडून सर्वांना प्रभावित केलेल्या राजस्थान रॉयल्सच्या यशस्वी जैसवालची स्टँड बाय खेळाडू म्हणून निवड केली.

भारतीय कसोटी संघातील जवळपास सर्व खेळाडू इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. यशस्वीने देखील नेट्समध्ये फलंदाजी करण्यास सुरूवात केली. दरम्यान, यशस्वी फलंदाजी करत असताना विराट कोहलीचे त्याच्याकडे विशेष लक्ष होते. तो यशस्वीला स्टान्स आणि शॅडो प्रॅक्टिस कसे करायचे हे सांगितले.

Yashasvi Jaiswal WTC Final 2023
Wrestler Protest : परमेश्वर माझ्याकडून मोठं काम करवून घेणार... लैंगिक शोषणाचा आरोपांवर बृजभूषण हे काय म्हणाले?

यशस्वी जैसवालने अजून भारतीय संघाकडून पदार्पण केलेले नाही. तो आता कुठे 21 वर्षांचा आहे. त्याला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे. रोहित शर्मा आणि शुभमन गिल हेच सलामी देतील.

यशस्वी भारतीय कसोटी संघासोबत आहे. तो सध्या भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंकडून टिप्स घेत आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

यशस्वीची आयपीएलमधील फलंदाजी पाहून जगभरातील अनेक दिग्गजांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले होते. यशस्वीबाबत एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, 'माझ्या दृष्टीने यशस्वी जैसवाल हा लंबी रेस का घोडा आहे. तो तरूण आहे आणि त्याच्याकडे सर्व प्रकारचे फटके आहेत.'

'तो शांत चित्ताने फलंदाजी करतो. मला त्याची फलंदाजी आवडते. तो गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतो. शुभमन गिल हा थोडा जास्त वयाचा आहे. मला वाटते की यशस्वी जैसवाल मोठी कारकिर्द निर्माण करेल. त्याच्याकडे दिग्गज फलंदाज होण्यासाठीचे सर्व गुण आहेत.'

Yashasvi Jaiswal WTC Final 2023
MS Dhoni Business : आंतरराष्ट्रीय शाळा ते फूटवेअर ब्रँड... धोनी नुसती शेती नाही तर करतो अनेक व्यवसाय

WTC Final भारतीय संघ : रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन, केएस भरत, शुभमन गिल, रविंद्र जडेजा, विराट कोहली, इशान किशन, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, अजिंक्य रहाणे, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, उमेश यादव.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.