Yashasvi Jaiswal IND vs ENG : यशस्वी जयस्वालने रचला इतिहास; रोहितची भविष्यवाणी उतरवली सत्यात

Yashasvi Jaiswal Rohit Sharma : यशस्वी जयस्वालने कसोटी कारकिर्दीतील आपले दुसरे शतक ठोकले.
Yashasvi Jaiswal
Yashasvi JaiswalESAKAL
Updated on

Yashasvi Jaiswal India Vs England 2nd Test : भारताचा 22 वर्षाचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालने इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटीत 152 चेंडूत शतकी खेळी केली. त्याने आपले हे शतक षटकार मारत पूर्ण केले. ज्यावेळी रोहित शर्मा 14 धावा आणि शुभमन गिल 34 धावा करून बाद झाले त्यावेळी युवा यशस्वीवरच भागीदारी रचत संघाचा डाव सावरण्याची जबाबदारी आली होती.

यशस्वीने ही जबाबदारी यशस्वीरित्या पूर्ण केले. त्याने श्रेयस अय्यरसोबत 90 धावांची महत्वपूर्ण भागीदारी रचली. शतक ठोकूनही यशस्वी खेळपट्टीवर टिकून होता. मात्र अय्यरने 27 धावा करत त्याची साथ सोडली. आता पुन्हा यशस्वीवर भारतासाठी एक मोठी खेळी करण्याची जबाबदारी आली आहे.

दरम्यान, यशस्वीबद्दल कर्णधार रोहित शर्माने काही वर्षापूर्वी भविष्यवाणी केली होती. त्याने यशस्वीच्या पोस्टवर कमेंट करताना पुढचा सुपरस्टार म्हणून यशस्वीचा उल्लेख केला होता. आज त्याने कर्णधारासमोरच शतकी खेळी करून त्याची भविष्यवाणी सत्यात उतरवली.

Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswal : षटकारानं शतक पूर्ण! मालिकेत पिछाडीवर... रोहितही स्वस्तात बाद मात्र यशस्वी अडचणीत संघासाठी राहिला उभा

दरम्यान, यशस्वी जयस्वालने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 - 25 च्या हंगामात एक मोठा माईलस्टोन पार केला. तो यंदाच्या WTC हंगामात दोन शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे.

यशस्वी जयस्वालने आपल्या या शतकी खेळीत 11 चौकार आणि 3 षटकार मारले. यशस्वी 80 च्या घरात पोहचल्यानंतर आक्रमक फटकेबाजी करत टॉम हार्टलीला सलग 3 चौकार मारले. आता यशस्वी जयस्वाल आणि कसोटी पदार्पण करणाऱ्या रजत पाटीदारसोबत भारताला 200 धावांचा टप्पा पार करून दिला आहे.

Yashasvi Jaiswal
Ind vs Eng : पदार्पणातच मोठी शिकार.... 20 वर्षाच्या खेळाडूनं 'हिटमॅन'ला अलगद अडकवलं, पाहा Video

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघाने आपल्या संघात तीन बदल केले आहेत. दुखापतग्रस्त केएल राहुल आणि रविंद्र जडेजाऐवजी संघात रजत पाटीदार आणि कुलदीप यादव यांचा समावेश करण्यात आला.

तर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजच्या ऐवजी मुकेश कुमारला संधी दिली आहे. मोहम्मद सिराजला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे दुसऱ्या कसोटीत विश्रांती देण्यात आली आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.