IND vs ENG Yashasvi Jaiswal : यशस्वीने टीम इंडियाचा उचलला निम्मा भार; उरलेल्या सात फलंदाजांनी कसंबसं केलं दीडशतक पार

Yashasvi Jaiswal
Yashasvi Jaiswalesakal
Updated on

Yashasvi Jaiswal : भारताने दुसऱ्या कसोटीत इंग्लंडविरूद्ध पहिल्याच दिवशी 336 धावा ठोकल्या. या धावांमधील सर्वाधिक वाटा हा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालचा आहे. त्याने दिवसअखेर नाबाद 179 धावा केल्या. यशस्वीने एकट्याने भारताच्या निम्म्यापेक्षा जास्त धावा केल्या.

आजच्या दिवसात भारताच्या इतर सात फलंदाजांनी मिळून 156 धावा केल्या. यात रोहितच्या 14, शुभमन गिलच्या 34, अय्यरच्या 27, पाटीदारच्या 32, अक्षरच्या 27, केएस भरतच्या 17 तर अश्विनच्या नाबाद 5 धावांचा समावेश आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताने पहिल्याच सत्रात दोन फलंदाज गमावले. रोहित शर्मा 14 तर शुभमन गिल 34 धावा करून बाद झाला होता.

मात्र त्यानंतर पहिल्या सत्रात अर्धशतक ठोकणाऱ्या यशस्वी जयस्वालने दुसऱ्या सत्रात श्रेयस अय्यरसोबत तिसऱ्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचली. दरम्यान, जयस्वालने शतक ठोकले. त्याने 80 धावांवर असताना आक्रमक फटकेबाजी केली. शतकही त्याने षटकार मारतच पूर्ण केलं.

मात्र ही भागीदारी शतकी झाली नाही. टॉम हार्टलीने श्रेयस अय्यरला 27 धावांवर बाद केलं. अय्यर बाद झाल्यानंतर आलेल्या रजत पाटीदारसोबत यशस्वीने अर्धशतकी (70) भागीदारी रचली. पदार्पण करणारा रजत चांगला खेळत होता. मात्र 32 धावांवर असताना रेहानचा चेंडू डिफेन्स केल्यानंतरही तो बोल्ड झाला.

डिफेन्सनंतर चेंडू स्टम्पवर आदळला अन् तो बोल्ड झाला. दरम्यान, यशस्वीने तिसऱ्या सत्रात देखील झुंजार फलंदाजी करत आपले दीडशतक पूर्ण केलं. त्याने अक्षर पटेलसोबत भागीदारी रचण्यास सुरूवात केली. यशस्वीने अक्षरसोबतही अर्धशतकी भागीदारी रचत संघाला 300 धावांचा टप्पा पार करून दिला.

Yashasvi Jaiswal
Ind vs Eng : दुर्दैवी...! पदार्पणाच्या सामन्यात रजत पाटीदारने सगळं योग्य केलं मात्र..., व्हिडिओ होतोय व्हायरल

ही जोडी दिवसअखेर पर्यंत नाबाद राहील असं वाटलं होतं. मात्र बशीरने 27 धावा करणाऱ्या अक्षरला झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या केएस भरतने आक्रमक फलंदाजी केली. मात्र तो देखील दिवस संपायला अवघी काही षटके राहिली असताना 17 धावांची भर घालून बाद झाला. भारताची अवस्था 4 बाद 301 धावांवरून 6 बाद 330 धावा अशी झाली. अखेर अश्विन अन् यशस्वीने आणखी पडझड न होता. दिवस 6 बाद 336 धावांवर संपवला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.