Yashasvi Jaiswal WI vs IND : भारताचा डावखुरा युवा सलामीवीर यशस्वी जैसवालने पदार्पणाच्या सामन्यातच आपण लंबी रेस का घोडा असल्याचे दाखवून दिले. त्याने पदार्पणाच्या सामन्यातच 387 चेंडू खेळून काढत 171 धावांची दमदार दीडशतकी खेळी केली. मात्र अर्झारी जोसेफच्या एका बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्याचा मोह त्याला आवरला नाही आणि त्याचे पदार्पणात द्विशतक ठोकण्याचे स्वप्न भंगले. (West Indies Vs India 1st Test)
यशस्वी जैसवालला कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावणारा पहिला फलंदाज होता आलं नसलं तरी त्याने असा एक कारनामा केला आहे जो आतापर्यंत कोणत्याही कसोटी फलंदाजाला करता आलेला नाही. यशस्वी जैसवालने विंडीज विरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी आपले दीडशतक पूर्ण केले अन् इतिहासात आपल्या नावाची नोंद सुवर्णाक्षरांनी केली.
यशस्वी जैसवाल हा भारतकडून आशिया खंडाबाहेर कसोटी पदार्पणात भारताकडून दीडशतकी खेळी करणारा इतिहासातील पहिलाच खेळाडू ठरला आहे. यापूर्वी भारताकडून शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी कसोटी पदार्पणात दीडशतकी खेळी केली आहे. मात्र ही दीडशतकी खेळी त्यांनी भारतात केली होती. (Yashasvi Jaiswal Test Cricket Record)
शिखर धवन - 187 धावा
रोहित शर्मा - 177 धावा
यशस्वी जैसवाल - 171 धावा
यशस्वी जैसवालने तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात आक्रमक सुरूवात केली. त्याने विराट कोहलीसोबत तिसऱ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी रचली. या दोघांनी भारताला पहिल्या डावात 350 धावांच्या पार पोहचवले. भारताची आघाडीही 200 पार पोहली होती.
यशस्वी जैसवाल बाद झाल्यानंतर विराट कोहलीने आपले 29 वे कसोटी अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या साथीला आलेला अजिंक्य रहाणे अवघ्या 3 धावांची भर घालून माघारी परतला. त्यानंतर विराट कोहलीने रविंद्र जडेजासोबत भागीदारी रचण्यास सुरूवात केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.