SL vs IND : 21 व्या शतकात जन्मलेल्या पदिक्कलचा खास रेकॉर्ड

सातत्याने सर्वोत्तम कामगिरीमुळे त्याला श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळाली.
Devdutt Padikkal
Devdutt PadikkalTwitter
Updated on

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. श्रीलंकेने 4 विकेट्स राखून सामना जिंकत मालिकेत बरोबरी केलीये. या सामन्यात भारताकडून चार खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये पदार्पण केले. यात ऋतूराज गायकवाड, देवदत्त पदिक्कल, नीतिश राणा आणि चेतन सकारिया यांचा समावेश होता. या चार नवोदितांमधील देवदत्त पदिक्कलच्या नावे एका खास रेकॉर्डची नोंद झालीये. 21 व्या शतकात जन्मलेला पदिक्कल टीम इंडियात स्थान मिळवणारा पहिलाच खेळाडू ठरलाय. पदिक्कलचा बर्थ डेट 7 जूलै 2000 अशी आहे. (You Know Devdutt Padikkal Created History Debuting First 21st Century Born Player To Represent India)

क्रुणाल पांड्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याच्या संपर्कातील 9 जणांना क्वारंटाईन होण्याची वेळ आलीये. त्यानंतर दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघात चार नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली. आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या देवदत्त पदिक्कलने लक्षवेधी कामगिरी केलीये. देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याचा धमाका पाहायला मिळाला आहे. मोठी खेळी करुन सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता देवदत्त पदिक्कलमध्ये आहे.

Devdutt Padikkal
SL vs IND : टीम इंडियावर आलीये नेट बॉलरसह खेळण्याची वेळ

सातत्याने सर्वोत्तम कामगिरीमुळे त्याला श्रीलंका दौऱ्यावर संधी मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु असेल किंवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो डावाला सुरुवात करतो. पण श्रीलंके विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळला. त्याने सुरुवात चांगली केली. या सामन्यात त्याने आपल्या भात्यातील फटकेबाजीचा नजराणा दाखवून दिला. त्याने इनिंग बिल्ड केली पण त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात चुकला. 29 धावांवर हसरंगाने त्याची विकेट घेतली. आपल्या या छोट्या खेळीत त्याने 1 चौकार आणि एक षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. निर्णायक सामन्यात त्याच्याकडून दमदार खेळीची अपेक्षा असेल.

Devdutt Padikkal
नवरा-बायकोची सिंगल्समध्ये कमाल, भारताला पदकाची आस

दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 षटकात 5 बाद 132 धावा केल्या होत्या. यात पदिक्कलचे 29 धावांचे योगदान होते. श्रीलंकने 4 विकेट्स राखून भारतीय संघाने दिलेले आव्हान परतवून लावत मालिका बरोबरीत आणलीये. लागोपाठ दुसऱ्या दिवशी दोन्ही संघ मैदानात उतरणार असून वनडे नंतर भारतीय संघ टी-20 मालिकाही खिशात घालणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दुसरीकडे श्रीलंकेचा संघ घरच्या मैदानावरील वनडे मालिका गमावल्यानंतर टी-20 मालिका जिंकण्यासाठी प्रयत्नशील असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.