भारतीय संघाला पहिला वहिला वर्ल्ड कप जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या यशपाल शर्मांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. 1983 च्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांनी भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. यशपाल शर्मा यांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पणाच्या मागे दिलीप कुमार यांचा मोठा हात होता. त्यामुळे ते दिवंगत दिलीप कुमार यांना वडिल मानायचे.
भारतीय संघातील माजी क्रिकेटर यशपाल शर्मा यांनी बॉलिवडचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनानंतर एका मुलाखतीमध्ये खुद्द यासंदर्भातील खुलासा केला होता. काही दिवसांपूर्वीच बॉलिवडूचे दिग्गज अभिनेते दिलीप कुमार यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता ऐकल्यानंतर यशपाल शर्मा यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय करियर घडण्यात दिलीप कुमार यांचा हात असल्याच्या आठवणीला उजाळा दिला होता.
यशपाल शर्मा म्हणाले होते की, ते (Dilip Kumar) माझ्यासाठी वडिलांप्रमाणेच होते. युसूफ भाई (दिलीप कुमार यांचे मूळ नाव युसूफ खान) यांच्यामुळे माझे आयुष्य बदलले. 1974-75 मध्ये मोहन नगर ग्राउंडवर पंजाब आणि उत्तर प्रदेश यांच्यातील बाद फेरीतील लढत पाहण्यासाठी दिलीप कुमार स्टेडियमवर उपस्थितीत होते. या सामन्यात दोन्ही डावात मी शतकी खेळी केली होती. एका अलिशान कारमधून आलेली व्यक्ती व्हिआयपी स्टँडमधून कोणी तरी व्यक्ती मॅच पाहत असल्याचे मी नोटीस केले होते.
ते राजकीय नेते असतील असे मला वाटले. सामन्यानंतर युसूफ भाईंनी माझ्याशी संवाद साधला. शतकी खेळीबद्दल त्यांनी अभिनंदन केले. तुझ्या नावाची शिफारस करीन, असे ते म्हणाले. दुसऱ्या दिवशी दिलीप कुमार यांच्यासोबतचा फोटो छापून आल्याची आठवणही यशपाल शर्मा यांनी सांगितली होती. दिलीप कुमार यांनी बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष राजसिंग डुंगरापूर यांच्याकडे शिफारस केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा मार्ग सूकर झाल्याचेही ते म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.