ICC ट्रॉफी सोडा IPL ही जिंकली नाही; विराट नेतृत्वावर रैनाचे बोल

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना सुरेश रैनाने यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
Virat Kohli And Raina
Virat Kohli And RainaFile Photo
Updated on

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. भारतीय संघाने त्याच्या नेतृत्वाखाली दमदार कामगिरी केली असली तरी आयसीसीची ट्रॉफी जिंकून देण्यात तो अपयशी ठरताना दिसतोय. विराट कोहलीचा कसोटीमधील नेतृत्वाचे रेकॉर्ड हे इतर कॅप्टन्सच्या तुलनेत उत्तम आहे. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सर्वाधिक 33 सामने जिंकले आहेत. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर विराटच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना सुरेश रैनाने यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. (You Talking About ICC Trophy Virat Kohli Didnt Even Win IPL Said Suresh Raina )

न्यूज 24 स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये रैना म्हणाला की, कोणत्याही कॅप्टनला वेळ देण गरजेचं असते. विराट कोहली एक चांगला कॅप्टन आहे. तो टीम इंडियाला आयसीसीची ट्रॉफी नक्कीच जिंकून देईल, असा विश्वास रैनाने व्यक्त केलाय. तो क्रिकेटच्या मैदानात खूप यशस्वी ठरेल, असे भाकीतही रैनाने कोहलीच्या आकड्यांचा दाखला देत केले.

Virat Kohli And Raina
Euro : वर्णभेदाच्या प्रकारानंतर पीटरसननेच काढली इंग्लंडची लायकी

आपण आयसीसी ट्रॉफीचा विचार करतोय पण सत्य हे आहे की विराट कोहलीने अद्याप आयपीलची ट्रॉफीही जिंकलेली नाही. त्याला आणखी वेळ देण्याची गरज आहे. सध्याच्या घडीला वेगवेगळ्या प्रकारात आयसीसीच्या प्रमुख स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहचणे सोपी गोष्ट नाही, असेही तो म्हणाला.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पराभव हा इंग्लंडमधील वातावरणातील परिस्थितीमुळे झालेला नाही. भारतीय संघातील फलंदाज कुठे तरी कमी पडले. या पराभवाची जबाबदारी फलंदाजांनीच घ्यायला हवी, असेही रैनाने म्हटले आहे.

Virat Kohli And Raina
Euro 2020 : इंग्लंडच्या पराभवानंतर राडा घालणाऱ्या 49 जणांना अटक

2017 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विराटच्या नेतृत्वाखालीच भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. तत्कालीन भारतीय संघाचे कोच अनिल कुंबळे आणि कर्णधार विराट कोहली यांच्यातील वादाचीही चांगलीच चर्चा भारतीय संघाच्या पराभवानंतर रंगली होती. 2019 मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला प्रबळ दावेदार मानले गेले. पण यावेळी सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडच्या संघानेच टीम इंडियाला बाहेरचा रस्ता दाखवला. विशेष म्हणजे या पराभवानंतरही रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यात दूरावा निर्माण झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.