कोरोना लढ्यात युवराजही उतरला; 1000 बेड्सची करणार मदत

कोरोना लढ्यात युवराजही उतरला; 1000 बेड्सची करणार मदत
Updated on

कोरोना महामारीची दुसरी लाट हळू-हळू ओसरत आहे. रुग्णसंख्याही कमी होत आहे. पण कोरोना विषाणूचा धोका मात्र कायम आहे. दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला होता. तिसऱ्या लाटेत सर्व आरोग्य व्यवस्था उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारसोबत एनजीओ आणि प्रसिद्ध खेळाडू, कलाकार आणि व्यावसायिक पुढे आले. भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग यानेही यामध्ये खारीचा वाटा उचलला आहे.

भारतीय संघाचा माजी धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग यानं रुग्णालयांमधील बेड वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहे. ‘यू वी कॅन’ या एनजीओच्या माध्यमातून युवराज भारतामधील रुग्णालयाना एक हजार बेड्स उपलब्ध करुन देणार आहे. कोरोना लढ्यामध्ये एकापाठोपाठ एक क्रिकेटपटू पुढे येत आहेत. विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि इतर खेळाडूप्रमाणेच युवराजनेही कोरोना लढ्यात मोलाचा वाटा उचलला आहे.

कोरोना लढ्यात युवराजही उतरला; 1000 बेड्सची करणार मदत
Video : बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॅटिंगवर युवराज सिंग झाला फिदा!

वन एंटरटेनमेंटच्या भागीदारीत हा उपक्रम सुरू केला जाईल, असे ‘यू वी कॅन’कडून सांगण्यात आलं आहे. ऑक्सिजन, बेड, व्हेंटिलेटरद्वारे रुग्णालयांची क्षमता वाढवणे हे आमचे लक्ष्य असल्याचे फाऊंडेशनकडून स्पष्ट करण्यात आलं. युवराज सिंगने याबाबत ट्विट करत माहिती दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये युवराज म्हणाला की, 'कोरोना महामारीमध्ये सर्वांनी आपल्या जवळील लोकांना गमावलं. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, आयसीयू बेड्स आणि इतर आवश्यक सुविधांसाठी असंख्य लोकांना झगडताना पाहिले आहे. यावरुन मी खूप प्रभावित झालो आणि मला वाटले की आपण आपल्या आरोग्य सुविधा पुरविणाऱ्या लोकांना तसेच केंद्र व राज्य सरकारांना मदत करायला पुढे आलो, असे युवराज म्हणाला.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशात एक लाख 32 हजार 788 नवीन कोरोना रुग्ण वाढले आहेत तर तीन हजार 207 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत दोन लाख 31 हजार 456 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()