Yuvraj Singh MS Dhoni Friendship : जागतिक क्रिकेटवर्तुळात भारताचे युवाराज सिंग आणि महेंद्रसिंह धोनी हे दोन अव्वल मॅच फिनिशर म्हणून ओळखले जायचे. दोघांनी भारतीय संघासाठी अनेक सामने जिंकून दिले आहेत. मात्र या दोघांच्या ऑफ द फिल्ड मैत्रीबद्दल अनेक चर्चा सुरू असतात. अखेर युवराज सिंगने धोनीसोबतच्या मैत्री कशी आहे याचा उलगडा केला.
भारताने 2007 आणि 2011 चा वर्ल्डकप जिंकला त्यावेळी दोन्ही वर्ल्डकपमध्ये संघाचं नेतृत्व महेंद्रसिंह धोनी करत होता तर या दोन्ही वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगने सर्वोत्तम कामगिरी केली होती.
दरम्यान, युवराज सिंगने नुकतेच द रणवीर शोमध्ये धोनी सोबतच्या नात्यावर वक्तव्य केलं. युवराज म्हणाला की, 'मी आणि महिंद्रसिंह धोनी क्लोज फ्रेंड नाही. आम्ही क्रिकेटमुळे मित्र झालो होतो. आम्ही दोघं एकत्र क्रिकेट खेळत होतो. धोनीची लाईफ स्टाईल माझ्यापेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे आम्ही कधी चांगले मित्र होऊ शकलो नाही.'
'मात्र ज्या ज्यावेळी मी आणि माही मैदानावर उतरलो त्या त्यावेळी आम्ही देशासाठी आमचं 100 टक्के योगदान दिलं. तो कर्णधार होता तर मी उपकर्णधार होतो. मी संघात आलो त्यावेळी मी चार वर्षे ज्यूनियर खेळाडू होते. ज्यावेळी तुम्ही कर्णधार आणि उपकर्णधार असता त्यावेळी तुमच्या मतभेद तर होणारच.
धोनीने खरं काय ते सांगून टाकले
युवराज सिंग म्हणाला की धोनीने कधी कधी असे निर्णय घेतले जे मला आवडले नव्हते. असं प्रत्येक संघात होतं. ज्यावेळी मी माझ्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्यावर होतो त्यावेळी मला माझ्या कारकिर्दीबाबतचं चित्र स्पष्ट होत नव्हतं त्यावेळी मी धोनीकडून सल्ला मागितला होता.
त्यावेळी त्यानेच निवडसमिती तुझ्या नावाचा विचार करत नाहीये असे सांगितले होते. मला वाटतं की मला त्यावेळी कमीत कमी खरी गोष्ट तरी समजली. ही गोष्ट 2019 च्या वर्ल्डकपपूर्वीची आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.