Asia Cup 2023 Yuzvendra Chahal and Dhanashree Verma : आशिया कप 2023 साठी टीम इंडियाची घोषणा झाली तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटले की युझवेंद्र चहलसारख्या खेळाडूचा या संघात समावेश नाही. टीम इंडियाने आशिया कपसाठी आपल्या संघात एकही लेग-स्पिनर ठेवला नाही. मोठी गोष्ट म्हणजे युझवेंद्र चहलसारख्या विकेट घेणार्या गोलंदाजालाही रोहित शर्मा संघात घेण्यास योग्य वाटला नाही.
युझवेंद्रच्या अश्या बाहेर जाण्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी क्रिकेटपटू इरफान पठाणने टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यादरम्यान संघात स्थान न मिळाल्याने चहलने सोशल मीडियावर इमोजीद्वारे आपली निराशा व्यक्त केली. त्याचवेळी त्याची पत्नी धनश्री वर्माने एक पोस्ट शेअर करताना प्रश्न विचारला आहे.
आता चहलच्या पत्नीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर तिच्या अकाउंटवरून एक क्रिप्टिक स्टोरी शेअर करताना प्रश्न विचारत लिहिले की, आता मी यावर गंभीरपणे प्रश्न विचारत आहे की खूप नम्र आणि मितभाषी असणं हे तुमच्या कामाच्या वाढीसाठी हानीकारक असतं का? किंवा आपल्याला आयुष्यात पुढं जाण्यासाठी सतत बोलत राहणं आणि स्ट्रीट स्मार्ट असंण गरजेचं आहे?
युझवेंद्र चहलबद्दल सांगायचे तर, त्याला यावर्षी फक्त 2 वनडे खेळण्याची संधी मिळाली, ज्यामध्ये तो केवळ 3 विकेट्स घेऊ शकला. संघात निवड न झाल्यानंतर, चहलने ढगाच्या मागे लपलेल्या सूर्याच्या इमोजीसह बाण दाखवून लख्ख प्रकाश देणारा सूर्य असे इमोजी वापरले. सूर्य उगवतोच असे सांगायचे असल्याचा अंदाज लावला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.