भारतीय संघाचा लेगस्पिनर युजवेंद्र चहल आयपीएल 2023 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे. तसेच चहल स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्येही असून त्याची टीमही चांगली कामगिरी करत आहे. चेन्नई सुपर किंग्जवर विजय मिळवल्यानंतर संघाने गुणतालिकेतही अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे ते प्लेऑफमध्येही पोहोचतील हे निश्चित दिसते. दरम्यान, युजवेंद्र चहलचा एक व्हिडिओ सध्या ट्विटरवर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
व्हायरल व्हिडिओमध्ये चहल दारूच्या नशेत असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल होत असलेल्या लेगस्पिनर युजवेंद्र चहलच्या व्हिडिओमध्ये त्याला सरळ चालताही येत नाही. त्याच्यासोबत चालणाऱ्या व्यक्तीच्या खांद्यावर त्याने हात ठेवला आहे. तीच व्यक्ती गाडीचे दार उघडून त्यांना ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या सीटवर बसवते. कारमध्ये बसूनही चहल अस्वस्थ दिसत आहे. कारच्या विंडशील्डवर मुंबई इंडियन्सचा लोगो चिकटवण्यात आला आहे.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या पार्टीलाही तो उपस्थित असल्याचा दावा केला जात आहे. त्याच पार्टीतून बाहेर पडताना हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. रोहितचा वाढदिवस 30 एप्रिलला आहे आणि त्याआधी त्याने एक मोठी पार्टी आयोजित केली होती. मात्र, चहल दारूच्या नशेत होता की आणखी काही हे कळू शकलेले नाही.
राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना हा आता मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. चहलने मुंबईसाठीच आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघात सामील झाला. या मोसमात मुंबईला 7 सामन्यात केवळ 3 विजय मिळाले आहेत. तसेच रोहित शर्माचा संघ गुणतालिकेत 8व्या क्रमांकावर आहे.
चहलने आतापर्यंत 8 सामन्यात 12 फलंदाजांना बाद केले आहे. सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत तो 7 व्या क्रमांकावर आहे. तो राजस्थानसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. एका वेळी त्याच्याकडे पर्पल कॅपही होती. पण सध्या तो पर्पल कॅप मिळवण्यापासून फक्त दोन विकेट्स दूर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.