युझवेंद्र चहलने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय गोलंदाज

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर चहलने हा खास विक्रम केला आहे.
yuzvendra chahal first indian bowler to take 4 more wickets in odi at lords stadium
yuzvendra chahal first indian bowler to take 4 more wickets in odi at lords stadiumsakal
Updated on

Yuzvendra Chahal England vs India 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळल्या जात आहे. दुसऱ्या सामन्यात युझवेंद्र चहलने आपल्या फिरकीची जाळ्यात एकापाठोपाठ एक 4 इंग्लिश फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर चहलने हा खास विक्रम केला आहे. चहलने लॉर्ड्सवर 4 बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज बनला आहे.(yuzvendra chahal first indian bowler to take 4 more wickets in odi at lords stadium)

1983 च्या विश्वचषकात लॉर्ड्सवर यापूर्वी वेस्ट इंडिजविरुद्ध मोहिंदर अमरनाथने 26 धावांत 3 बळी घेतल्या होत्या. याच मैदानावर आशिष नेहराने 2004 साली इंग्लंडविरुद्ध 26 धावांत 3 बळी घेतले होते. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात चहलने 10 षटकात 47 धावा देत 4 बळी घेत अप्रतिम कामगिरी केली. चहलने बेअरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स आणि मोईन अली यांना आपल्या फिरकीत जाळ्यात अडकून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चहलने लॉर्ड्सवर 4 विकेट घेत भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव नोंदवले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()