Yuzvendra Chahal Kick Tabraiz Shamsi Ind vs Sa : भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल त्याच्या कूल स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. युजी मैदानावर आणि मैदानाबाहेर अनेकदा मजा करताना दिसला आहे. भारत दक्षिण आफ्रिका टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही अशीच काहीशी घटना घडली. या सामन्याच्या मध्यभागी युझवेंद्र चहल दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीला लाथ मारली. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडिया प्रंचड व्हायरल होत आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान ही घटना घडली होती. फ्लडलाइट्सच्या समस्येमुळे सामना काही काळासाठी थांबवला होता. त्या दरम्यान युझवेंद्र चहल कॅमेऱ्यात कैद झाला. व्हायरल व्हिडिओमध्ये ऋषभ पंत, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम आणि तबरेझ शम्सी उभे असल्याचे दिसत आहे. तेव्हा युजवेंद्र चहलही त्यांच्याकडे येतो. युजी मजा करत तबरेज शम्सीला गुडघ्याने लाथ मारताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या मालिकेत युजवेंद्र चहलला आतापर्यंत भारतीय संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळले नाही. चहलच्या जागी अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे. अश्विनने पहिल्या सामन्यात चार षटकात 1 ओव्हर मेडन करत फक्त 8 धावा दिल्या.
गुवाहाटी टी-20 मध्ये प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 3 गडी गमावून 237 धावा केल्या. केएल राहुल (57), रोहित शर्मा (43), विराट कोहली (49) आणि सूर्यकुमार यादव (61) यांनी शानदार खेळी खेळली. प्रत्युत्तरात डेव्हिड मिलर (106) आणि क्विंटन डी कॉक (69) यांच्या खेळीमुळे आफ्रिके संघही विजयाच्या जवळ पोहोचला, पण ते लक्ष्यापासून 16 धावांनी लांब राहिला. टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामनाही 8 गडी राखून जिंकला. अशा स्थितीत तिने या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.