Yuzvendra Chahal : हीच खरी योध्याची ताकद... वगळलेल्या युझवेंद्रची दमदार कामगिरीसह धमाकेदार पोस्ट

Yuzvendra Chahal Motivational Post
Yuzvendra Chahal Motivational Postesakal
Updated on

Yuzvendra Chahal Motivational Post : भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलला गेल्या काही स्पर्धांमध्ये भारतीय संघात स्थान मिळवता आलेले नाही. आशिया कप, वनडे वर्ल्डकप आणि आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी 20 मालिकेत देखील त्याची संघात वर्णी लागलेली नाही.

मात्र युझीने निराश न होता देशांतर्गत स्पर्धेत धमाकेदार कामगिरी केली. त्याने विजय हजारे ट्रॉफीत हरियाणाकडून खेळताना उत्तराखंडविरूद्ध 6 विकेट्स घेतल्या. या धमाकेदार कामगिरीनंतर तितकीच प्रेरणादायी पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर केली.

Yuzvendra Chahal Motivational Post
Mohammed Shami Mother : तू माझ्यासाठी खूप महत्वाची आहेस... मोहम्मद शमीने आईसाठी केली भावनिक पोस्ट

युझवेंद्र चहलने या पोस्टमध्ये दोन फोटो शेअर केले आहेत. पहिला हा त्याचा विकेट सेलिब्रेशन करतानाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो आहे. दुसऱ्या फोटोत त्याने एक मोटिव्हेशनल कोट शेअर केला आहे.

'ज्यावेळी प्रत्येकजण वेगळा विचार करत असतो त्यावेळी असतात त्यावेळी तुमचं धैर्य एकत्रित करा. हीच खऱ्या योद्ध्याची ताकद असते.'

Yuzvendra Chahal Motivational Post
Rohit Sharma : "एक महिन्याने हसेल!" वर्ल्डकप फायनल हरल्यानंतर रोहितच्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल? जाणून घ्या सत्य

विजय हजारे ट्रॉफी 2023 मधील हरियाणा विरूद्ध उत्तराखंड सामन्याबद्दल बोलायचं झालं तर हरियाणाने उत्तराखंडचा डाव 207 धावात गुंडाळला. हरियाणाकडून युझवेंद्र चहलने 26 धावा देत 6 विकेट्स घेतल्या. तर त्याला राहुल तेवतिया आणि सुमित कुमारने प्रत्येकी 2 विकेट्स घेत चांगली साथ दिली.

उत्तराखंडचे 208 धावांचे आव्हान पार करताना युवराज सिंह (68 धावा), अंकित कुमार (49 धावा) आणि मेनारिया (44 धावा) यांनी दमदार फलंदाजी केली. हरियाणाने उत्तराखंडचा 6 विकेट्स राखून पराभव केला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.