SRH vs RR IPL 2023 : सनराईजर्स हैदराबादचा यंदाच्या हंगातील आपल्या घरच्या प्रेक्षकांसमोरचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स सोबत होता. आपल्या संघाला पाठिंबा देण्यासाठी मैदानावर हैदराबादच्या चाहत्यांनी तुफान गर्दी देखील केली होती. मात्र या सर्वांची निराशा झाली. राजस्थानने हैदराबादचा 72 धावांनी दारूण पराभव केला.
राजस्थानने विजयासाठी ठेवलेल्या 204 धावांचा पाठलाग करताना हैदराबादला 8 बाद 131 धावाच करता आल्या. राजस्थानकडून 4 षटकात 17 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. हैदराबादकडून अब्दुल समाद (32( आणि उमरान मलिक (8 चेंडूत 19 धावा) यांनी शेवटच्या टप्प्यात फटकेबाजी करत हैदराबादला शंभरी पार करून दिली.
राजस्थान रॉयल्सचे विजयासाठीचे 204 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादसाठी पॉवर प्लेचे पहिलेच षटक हे एका वाईट स्वप्नाप्रमाणे ठरले. बोल्टने तिसऱ्या चेंडूवर अभिषेक शर्माला बाद केले. त्यानंतर षटकाच्या पाचव्या चेंडूवर राहुल त्रिपाठी शुन्यावर बाद झाला. यामुळे पहिल्याच षटकात हैदराबादची अवस्था 2 बाद 0 धावा अशी झाली. यातून हैदराबाद सावरलीच नाही. त्यांना पॉवर प्लेमध्ये 2 बाद 30 धावाच करता आल्या.
पॉवर प्लेमध्ये मंदावलेल्या हैदराबादला नंतरही उभारी घेता आली नाही. बोल्टनंतर युझवेंद्र चहल, आर अश्विन आणि जेसन होल्डर यांनी हैदराबादच्या फलंदाजीला एका मागून एक धक्के देण्यास सुरूवात केली. यामुळे हैदराबादची अवस्था 6 बाद 52 धावा अशी झाली.
यानंतर राजस्थानच्या हैदराबादच्या पुढच्या फलंदाजांना फारशी प्रतिकार करण्याची संधी दिली नाही. हैदराबादच्या खेळाडूंनाही सामना हातून गेल्याची जाणीव झाल्याचे त्यांच्या बॉडी लँग्वेजमधून दिसत होते. अखेर उमरान मलिक आणि समादने शेवटी शेवटी काही आकर्षक फटकेबाजी करत हैदराबादला शंभरी गाठून देत लाज वाचवली. अखेर राजस्थानने सामना 72 धावांनी जिंकला.
तत्पूर्वी, आयपीएल 2023 च्या चौथ्या सामन्यात हैदराबादने आपल्या होम ग्राऊंडवर नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र राजस्थान रॉयल्सच्या तगड्या फलंदाजीने हा निर्णय उलटा पाडला.
सलामीवीर जोस बटलर आणि यशस्वी जैसवाल यांनी धडाकेबाज सुरूवात करत पहिल्या तीन षटकातच 37 धावा चोपल्या. जोस बटलरने तर 20 चेंडूत अर्धशतक ठोकले. हे यंदाच्या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात वेगवान अर्धशतक होते. मात्र फजलहक फारूकीने त्याला 54 धावांवर बाद केले. त्यानंतर जैसवालने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने देखील अर्धशतकी मजल मारत संजू सॅमसनच्या साथीने संघाला 136 धावांपर्यंत पोहचवले.
मात्र फारूकीने जैसवालला देखील बाद करत दुसरा सलामीवीर टिपला. यानंतर संजू सॅमसनने 28 चेंडूत अर्धशतकी खेळी करत राजस्थान रॉयल्सला 17 व्या षटकात 172 धावांपर्यंत पोहचवले. दरम्यान, उमरन मलिकने देवदत्त पडिक्कलला आणि टी नटराजनने रियान परागला बाद करत राजस्थानला धक्के दिले.
राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनची 32 चेंडूत केलेली 55 धावांची खेळी अखेर 19 व्या षटकात नटराजनने संपवली. अखेर हेटमायरने 16 चेंडूत 22 धावा ठोकत राजस्थानला 203 धावांपर्यंत पोहचवले.
हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.