Cricket News : डिज्नेसोबतचाही करार मोडला; ZEE आयसीसी स्पर्धांचे भारतातील प्रसारण हक्क देखील गमावणार?

Cricket News
Cricket Newsesakal
Updated on

ZEE and Disney Star Deal Scraps Of ICC TV rights : झी आणि सोनी यांच्या विलिनीकरणाची चर्चा खूप दिवस सुरू होती. मात्र हे विलिनीकरण काही झाले नाही. त्यामुळे झी ला डिज्ने सोबतचा करार देखील गुंडाळून ठेवावा लागला आहे. हा करार भारतात आयसीसी स्पर्धांचे प्रसाण हक्क मिळवण्याचा होता. आता भारतात आयसीसी इव्हेंट्स कोण प्रसारित करणार हा प्रश्न अनुत्तरित आहे.

Cricket News
IND vs ENG 1st Test Day 2 : भारताची दुसऱ्या दिवशी 421 धावांपर्यंत मजल; दिवसअखेर भारताकडे भक्कम आघाडी

नाट्यमयरित्या झी एन्टरटेनमेंटने डिज्ने स्टार सोबतचा 1.4 बिलियन डॉलर्सचा (जवळपास 11 हजार कोटी रूपये) गुंडळून ठेवला आहे. हा करार आयसीसी स्पर्धांचे भारतातील प्रसारण हक्क मिळवण्याबाबतचा होता. झी आणि सोनीचे जवळपास 10 बिलियन डॉलरचे विलिनीकरण फिसकटल्यानंतर ही नवी माहिती समोर आली आहे.

टीव्ही इंडस्ट्रीमधील विश्वसनीय सूत्रांनी पीटीआयला दिल्ल्या माहितीनुासर झी एन्टरटेनमेंट आता क्रिकेट कराराबाबत पुढचं पाऊल टाकणार नाहीये. त्यांनी या कराराअंतर्गातील पहिली 200 मिलियन डॉलर्सची रक्कम देखील भरलेली नाही.

हा करार मोडल्यामुळे आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2024 आणि 2026, 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी यांचे भारतातील प्रसारण कोण करणार हा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वी झी ने टीव्ही प्रसारण हक्क मिळवले होते.

Cricket News
Zimbabwe Cricket News : क्रिकेटविश्वात उडाली खळबळ! अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी दोन खेळाडूंवर बंदी

झी - सोनी विलिनीकरण रद्द

सोमवारी सोनी कॉरपॉरेशनने झी सोबतचा विलिनीकरणासंदर्भातील झी सोबतचा करार मोडला असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केलं होत. त्यांनी झी एन्टरटेनमेंटवर कराराचा भंग केल्या प्रकरणी 90 मिलियन डॉलरचा दावा ठोकला आहे. करारानुसार सोनी झी मध्ये 1.575 बिलियन डॉलरची गुंतवणूक करणार होता. मात्र हा करार मोडल्याने दोन्ही कंपन्यांचे भविष्य अधांतरी राहिले आहे.

(Sports Latest News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()