Robin Uthappa : 6,6,6,6,6,6,4,4... रॉबिन उथप्पाने झिम्बाब्वेमध्ये घातला राडा! 36 चेंडूत ठोकल्या 88 धावा

Robin Uthappa
Robin Uthappa
Updated on

Robin Uthappa : रॉबिन उथप्पाच्या नेतृत्वाखाली हरारे हरिकेन्सने टी-10 2023 एलिमिनेटरमध्ये केपटाऊन सॅम्प आर्मीचा 9 गडी राखून पराभव केला. या सामन्यात उथप्पाने कर्णधारपदाची खेळी खेळताना संघाला विजय मिळवून दिला. त्याने 36 चेंडूत 6 षटकार आणि 8 चौकारांच्या मदतीने नाबाद 88 धावा केल्या.

केपटाऊनने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकांत 146 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात हरारे संघाने 9.2 षटकांतच लक्ष्य गाठले. हरारेने दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान मिळवले आहे. आता त्याचा सामना डर्बन कलंदरशी होणार आहे.

Robin Uthappa
Suryakumar Yadav : टी-20चा स्टार सूर्याला वनडेत लागले ग्रहण! आता एकही चूक अन् World Cup मधून बाहेर?

प्रथम फलंदाजी करताना केपटाऊनने 10 षटकांत 3 गडी गमावून 145 धावा केल्या. यादरम्यान गुरबाजने 26 चेंडूत नाबाद 62 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि 6 षटकारांचा समावेश होता. राजपक्षेने 11 चेंडूत 25 धावा केल्या. करीमने 10 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. शॉन विल्यम्सने 12 चेंडूत नाबाद 28 धावा केल्या. त्याने 2 चौकार आणि 2 षटकार मारले.

Robin Uthappa
Video: तिसऱ्या डोळ्याने केली कमाल अन् इंग्लंडच्या खेळाडूंचे हसरे चेहरे एका क्षणात पडले

लक्ष्याचा पाठलाग करताना हरारेने 9.2 षटकांत एक विकेट गमावून विजय मिळवला. यादरम्यान रॉबिन उथप्पाने कर्णधारपदाची खेळी खेळली. उथप्पा शेवटपर्यंत टिकून राहिला. त्याने 36 चेंडूत नाबाद 88 धावा केल्या. यादरम्यान 8 चौकार आणि 6 षटकार मारले. एविन लुईसने 6 चेंडूत 12 धावा केल्या. त्याने एक चौकार आणि एक षटकार मारला. डोनाव्हॉन फरेराने 16 चेंडूत 35 धावांची नाबाद खेळी केली. त्याने एक चौकार आणि 4 षटकार मारले.

Robin Uthappa
WI vs IND 2nd ODI : कर्णधार रोहित घेणार मोठा निर्णय! 'त्या' फ्लॉप खेळाडूचा पत्ता कट, 'या' दिग्गजला देणार संधी?

टी-10 लीगचा पहिला क्वालिफायर डर्बन कलंदर आणि जोबर्ग यांच्यात खेळला गेला. या सामन्यात जोबर्गने 6 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह जोबर्गने अंतिम फेरीत धडक मारली. त्याचवेळी डरबनने पराभवासह दुसऱ्या क्वालिफायरमध्ये स्थान निश्चित केले. एलिमिनेटर सामना हरारे आणि केपटाऊन यांच्यात झाला. पराभवानंतर केपटाऊन स्पर्धेतून बाहेर पडला. तर हरारेने पात्रता फेरी गाठली. आता दुसरा क्वालिफायर जिंकणारा संघ 29 जुलै रोजी अंतिम फेरीत जोबर्गशी भिडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.