Sikandar Raza : झिम्बाब्वेच्या सिंकदर रझाने इतिहास रचला; स्टोक्स, सँटनरलाही टाकले मागे

Zimbabwe Batsmen Sikandar Raza Won ICC Player Of the Month Award
Zimbabwe Batsmen Sikandar Raza Won ICC Player Of the Month AwardESAKAL
Updated on

ICC Player Of the Month Award : झिम्बाब्वेचा स्टार फलंदाज सिकंदर रझाने गेल्या महिन्यात दमदार कामगिरी केली आहे. या कामगिरीचे फळ त्याला मिळाले असून त्याला ऑगस्ट 2022 चा आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार मिळाला आहे. विशेष म्हणजे आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ मिळवणारा सिकंदर रझा हा झिम्बाब्वेचा पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स आणि न्यूझीलंडचा डावखुरा फिरकी गोलंदाज मिशेल सँटनरला मागे टाकत हा पुरस्कार पटकावला. (Zimbabwe Batsmen Sikandar Raza Won ICC Player Of the Month Award For August 2022)

Zimbabwe Batsmen Sikandar Raza Won ICC Player Of the Month Award
Veda Krishnamurthy : भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमुर्तीला रणजीपटूने केले प्रपोज

झिम्बाब्वेच्या 36 वर्षाच्या सिकंदरने ऑगस्ट महिन्यात 3 वनडे शतके ठोकली आहेत. त्याने बांगलादेशविरूद्ध दोन आणि भारताविरूद्ध एक शतक ठोकले. तो झिम्बाब्वे संघाच्या फलंदाजीचा बॅक बोन झाला आहे. भारताविरूद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात झिम्बाब्वेला 290 धावांचे आव्हान मिळाले होते. त्यावेळी चेस करताना सिकंदर रझाने 95 चेंडूत 115 धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीमुळे भारत सामना हरतो की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

Zimbabwe Batsmen Sikandar Raza Won ICC Player Of the Month Award
David Warner : पुन्हा वॉर्नरच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ?

सिकंदर रझाने जागतिक स्तरावरील अव्वल गोलंदाजांसमोर दमदार फलंदाजी करत स्वतःला सिद्ध केले आहे. यामुळेच आयसीसीने त्याच्या कामगिरीची दखल घेत त्याला ऑगस्ट महिन्यातील प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देऊन सन्मानित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.